कारण

मोदींचे निवेदन; काहींना कौतुकाची थाप तर काहींना कोपरखळी

आज झालेल्या राज्यसभा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने भाषण दिले. या भाषणात मोदींनी वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश करत त्या क्षेत्रात कोरोम काळात केलेल्या कामगिरींचं कौतुक केलं तर विरोधकांना बोचरे बोल ही सुनावले. मोदींच्या मिश्किल वक्तृत्व शैलीचे चर्चे तर सर्वदूर पसरले
आहेत, आजच्या निवेदनातही याचा पुरेपूर आस्वाद मोदी चाहत्यांना घेता आला.

पंत्रप्रधान मोदी यांनी आपल्या निवेदनात कोरोना काळात सर्व क्षेत्रांनी देशाला सावरण्यास ज्या प्रकारे सहकार्य केले त्याचे कौतुक करत भारताच्या क्षमतेवर जगाचा विश्वास असल्याचे सांगितले. 21 व शतक भारतासाठी प्रेरणादाई असून देशाच्या गौरवगाथांमध्ये याचाही उल्लेख असेल असे ही सांगितले.

लसीकरण मोहिमेचे कौतुक :
कोरोनाकाळात जागाच लक्ष कोरोनलसी वर असताना कोणतीही लस ठराविक कसोटीवर खरी उतरत नव्हती त्यावेळेस संपूर्ण जागाच लक्ष भारतात बनणाऱ्या लसीवर होते. सर्व कसोटींवर भारतीय लास खरी उतरल्यावर मानवजातीच्या रक्षणासाठी भारताने लगेचच अनेक देशांनपर्यंत लसी पोहचवल्या आणि भारत जगाच्या विश्वासच केंद्र बनलं. सोबतच वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात चालू असणाऱ्या पोलिओ लसीकरण बद्दल ही मला अभिमान वाटतो असे मोदी यांनी सांगितले.
या कठीण प्रसंगात केंद्र आणि राज्यसरकारने सहमताने एकत्रित येऊन संपूर्ण शक्ती एक दिशेला एकवटून देशाला मोठ्या संकटातून बाहेर पडण्यास मदत केल्याचेही मोदींनी सांगितले. तसेच याचे श्रेय कोणत्या एका पक्षाचे किंवा व्यक्तीचे नसून संपूर्ण देशाचे आहे असेही सांगितले.

लोकतंत्रावर सवाल करणार्यांना उत्तर :
लोकतंत्रावर जे लोक प्रश्न करतात त्यांनी समजण्याचा प्रयत्न करा भारतीय लोकतंत्र हे वेस्टर्न इन्स्टिट्यूशन नाही आहे, ही ह्यूमन इन्स्टिट्यूशन आहे. असे मोदींनी आपल्या निवेदनात म्हंटले. तसेच आपण नेतांजींचे विचार, त्यांच्या भावना, त्यांचा आदर्श विसरल्याचे हे परिणाम आहेत असे ही सांगितले.
अनेक देश भारत हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असल्याचे सांगतात परंतु भारत तर लोकतंत्राची जननी आहे. आणि ही गोष्ट आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगायला हवी असे ही आवाहन मोदींनी सभे दरम्यान केले.
लोकशाही बद्दल बोलत असताना काँग्रेसवर निशाणा साधत मोदींनी 1975-77 च्या आणीबाणी च्या वेळेस लोकांनी एकत्र येऊन दिलेल्या लढ्याची आठवण काढत लोकशाहीच्या ताकदीचे कौतुक केले.

आत्मनिर्भरतेच्या मार्गावरील भारत :
जगातील अनेक देशांची आर्थिक परिस्थिती डगमगाईला आली असताना भारतातील अर्थव्यवस्था सावरलेली असल्याचे मोदींनी सांगितले. भारतात परकीय गुंतवणूक आणि डिजिटॅलिझशन वाढत असल्याचे ही मोदी यावेळी म्हणाले.
देशाला पुढे नेण्यासाठी गरिबीवर मत करावी लागेल आणि त्यासाठी आत्मनिर्भरता हाच एक मार्ग असून मी हे स्वानुभवातून सांगतोय असेही मोदी या वेळेस म्हणाले.
गरिबी घालवण्याच्या प्रयत्नात 10 कोटींपेक्षा जास्त शौच्छालय , 2 कोटींपेक्षा जास्त गरीब लोकांना हक्काची घर, 8 कोटींपेक्षा जास्त मोफत गॅस सुविधा आणि गैबाना 5 लाख रुपयां पर्यंत फोम इलाज अशा सुविधा पुरवल्याचे मोदींनी सांगीतले.

किसान आंदोलनाचा ज्वलंत मुद्दा:
विरोधक फक्त आंदोलन होतंय आणि ते कास होतंय हे सांगतात परंतु आंदोलन का होतंय हे कोणीच सांगत नाही असे म्हणत मोदींनी आपली बाजू मांडण्यास सुरवात केली. देशांतील आंदोलनस्थिती दर्शविताना मोदींनी मोठे शेतकरी आणि छोटे शेतकरी असा भेद जाणवून देत 2014 पूर्वी सर्व सोयी सुविधा फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठी होत्या आणि छोट्या शेतकर्यांना त्याचा काहीच फायदा नव्हता असे सांगितले. सोबतच 2014 नंतर बदल करून छोट्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आल्याचे सांगत मोदींनी ‘ फसल बिमा योजना’ ज्यात 90,000 कोटींचे भुगतान शेतकर्यां मिळाले, ‘किसान क्रेडिट कार्ड’ , ‘ पेन्शन योजना’ , ‘ प्रधानमंत्री सन्मान निधी’ , ‘किसान उडान योजना’ अशा योजनांचा उल्लेख करत शरद पवारांवर टीका केली. परिवर्तन होताना त्रास हा होताच हरितक्रांतीचे दिवस आठवा त्यावेळेस शास्त्रीजींवर सुद्धा टिका झालेल्या असं ही मोदींनी सांगितलं. तसेच कोरोना काळात शेतकऱ्यांमुळेच आपली अन्न शिदोरी शिल्लक राहिल्याचं सांगत मोदींनी शेतकऱ्यांचं कौतुक केलं.
हमीभाव होता आहे आणि राहणार असे आश्वासन ही मोदींनी सभेमध्ये दिले. कमी दारात मिळणारी राशन सेवा सुद्धा चालू राहणार असल्याने आंदोलन थांबवून परिवतर्नाचा स्वीकार करण्याचे आवाहन मोदींनी शेतकऱ्यांना केले.

आंदोलन जीवींना कोपरखळी :
प्रयेक प्रकारच्या आंदोलनात काही लोक सारखे सारखे दिसतात. हे लोक आंदोलन शिवाय जगूच शकत नाहीत. देशाने या लोकांना ओळखावे आणि त्यांच्या पासून वाचून राहावे. फॉरेन डिस्ट्रक्टिव्ह इडिओलॉजि पासून राहावं असेही मोदींनी सांगितले.

सीमेवरील जवानांचे कौतुक:
कोरोनाच्या कठीण प्रसंगात आपले जवान सीमेवर लढा देत आहेत. त्यांचे कौतुक आहे. चीन बद्दल ही आपली भूमिका स्पष्ट असल्याचे मोदींनी सांगितले.

निवेदनाच्या शेवटी मोदींनी, “2047 ला जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याचे शतक पूर्ण होत असेल तेव्हा देश ज्या उंचीवर असेल त्याची पायाभरणी आज होत आहे.” असे मोदींनी सांगितले. “मोदी है मोका लिजिए” असेही मोदी शेवटी म्हणाले.

एकंदरीत या निवेदनात मोदींनी त्यांच्या वक्तृत्व कौशल्या नुसार भारतीयांचे कोड कौतुक करत एका आधुनिक समृद्ध भारताचे दृश्य आपल्या सर्वां समोर मांडले आहे. पण या दृश्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणूनच आपल्या आजूबाजूला होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपली नजर ठेवा आणि स्वतः सोबतच आपल्या देशाचे भविष्यही उज्ज्वल करण्याच्या कामात सामील व्हा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments