कारण

Farmer Protest : मुलगा बॉर्डरवर आणि बाप दिल्लीत; मोदींच्या भूमिकेवर अमोल कोल्हे भडकले…

खासदार अमोल कोल्हे यांनी मोदींनी केलेल्या भाषणावर रोष व्यक्त करत लोकसभेत भाजपाला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. (Speech delivered by MP Amol kolhe)

लोकसभेत अमोल कोल्हे यांनी शेतकरीआंदोलनावरआपलं मत मांडताना ‘मुलगा सियाचीन ला बॉर्डरवर आणि बाप दिल्लीच्या कडकच्या थंडीत आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहे अशा परिस्थितीत कस बोलणार ‘जय जावन जय किसान’ असा प्रश्न उपस्थित केला. देशाला दोन नवीन शब्द मिळाले त्याबद्दल मी आभारी आहे कारण जेव्हा भाजपाचे नेते उठसूट आंदोलन करत होते तेव्हा त्या लोकांना आता काय म्हणायचं ते या शब्दांमुळे आम्हाला कळलं.
परंतु कष्टकरी लोकांसाठी ठामपणे उभे राहिलेले बाबा आढाव महाराष्ट्राचा अभिमान आहेत असं ठाम मत कोल्हे यांनी मांडलं. “ज्या देशाच्या स्वतंत्रतेचा पाया आंदोलन असेल त्या देशात असे वक्त्याव कास केलं जात?” असा प्रश्न ही अमोल कोल्हे यांनी विचारला.

जेव्हा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष संजीवनीची उपमा देतात तेव्हा आपण खुश होतो, जेव्हा अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष हावडी मोदी बोलतात तेव्हा आपण टाळ्या वाजवतो. परंतु जेव्हा कोणी विदेशी मानवाधिकार दृष्टीने शेतकरी आंदोलनावर कोणतीही टिप्पणी करतो तेव्हा ती फॉरेन डिस्ट्रक्टिव्ह आयडियॉलॉजि होते. अशा प्रकारचे फेन्सिंग लावणे, अडथळे निर्माण करणे हे असं वागणं कोणत्या लोकशाहीच लक्षण आहे असा सवालही त्यांनी केला.

निवेदनाच्या शेवटी या परिस्थितीत संवेदनशीलपणे मार्ग शोधण्याच आवाहन करत , ‘जेव्हा राजाचा अहंकार प्रजा हिता पेक्षा वर होईल तेव्हा समजून जाव की त्याच्या शासन काळाचा अंत लवकरच होणारआहे.’ अशी चाणक्यनीती सांगून छुपा इशाराही दिला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments