कारण

Jayant Patil : आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम करू, जयंत पाटील यांची भन्नाट फटकेबाजी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आज (16 फेब्रुवारी रोजी) वाढदिवस आहे. 16 फेब्रुवारी 1962 रोजी इस्लामपुरात त्यांचा जन्म झाला. काँग्रेसमधील जेष्ठ नेते राजारामबापू पाटील यांचा वारस असलेल्या जयंत पाटील यांनी वडिलांनंतर राजकारणात प्रवेश केला. (State President of NCP Jayant Patil)

1999 नंतर जयंत पाटील यांनी नव्याने उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची घोडदौड अद्याप सुरूच आहे. 17 ऑक्टोबर 1999 ते 6 डिसेंबर 2008 या कालावधीत सलग 9 वर्षे अर्थमंत्रीपद सांभाळणारे जयंत पाटील हे एकमेव नेते समजले जातात. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2009 या कालावधीत त्यांनी गृहमंत्रीपदही सांभाळले आहे.

9 नोव्हेंबर 2009 ते 30 ऑक्टोबर 2014 या कालावधीत जयंत पाटील यांनी ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती, राजकारणात यशस्वी प्रवेश, त्यानंतर मंत्रीमंडळात योग्य पद आणि तिथूनपुढे सुरू असलेली यशस्वी वाटचाल यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळत असल्याचे म्हटले जात आहे. शांत आणि संयमी स्वभावामुळे राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्यांच्या मनामध्ये त्यांनी घर केलं आहे.

जयंत पाटील यांच्या भाषणातून, मुलाखतीतून झालेली धमाकेदार फटकेबाजी सगळ्यांच्याच ओळखीची आहे, अशाच फटकेबाजीची मेजवानी खास तुमच्यासाठी…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments