एकदम जुनंफेमस

Wankhede Stadium : राग इतका भयंकर की उभारलं वानखेडे स्टेडियम, वाचा भन्नाट किस्सा

“क्रिकेट” असा एक खेळ ज्याच्याशी भारतीयांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. माणसाला जगायला जसं ऑक्सिजन गरजेचे आहे त्याचप्रमाणे क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी ऑक्सिजनच आहे. क्रिकेट खेळायचं म्हटलं की आपण बॅट, बॉल घेऊन सरळ मैदानावर, आपल्या एरियातील गल्लीत किंवा सोसायटीच्या मोकळ्या जागेत आपल्या टीमसोबत तयार असतो.

बरं, क्रिकेट जसं भारतीयांसाठी स्पेशल आहे तेवढंच स्पेशल आहे ते म्हणजे मुंबईतील सुप्रसिद्ध वानखेडे स्टेडियम. प्रत्येक भारतीयासाठी वानखेडे स्टेडियम विसरणे खूप अवघड आहे. कारण, वानखेडे स्टेडियमने प्रत्येकाला इतक्या आठवणी दिल्या आहेत की त्या विसरणे कठीण आहे. हेच वानखेडे स्टेडियम कसे निर्माण झाले याविषयीचा हा लेख..

एका अपमानामुळे झाला वानखेडे स्टेडियमचा जन्म

महाराष्ट्र राज्याचे पहिले अर्थमंत्री बॅरिस्टर शेषराव वानखेडे (Sheshrao Wankhede) हे आपल्याला राजकारणी म्हणून माहितंच असतील. मात्र राजकारणात असून देखील त्यांना क्रिकेट फार आवडायचे. 1963 साली मुंबई असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. याच दरम्यान, वसंतराव नाईक (Vasantrao Naik) मुख्यमंत्री असताना आमदारांच्या क्रिकेट सामन्यासाठी प्रसताव ठेवला गेला. शेषरावांनी तो प्रस्ताव लगेचच मंजूर केला आणि क्रिकेट सामन्यासाठी परवानगी दिली. मात्र सामना खेळविण्यासाठी जागा मिळत नव्हती.

त्यावेळी बॉम्बे क्रिकेट असोसिएशन (BCA) जवळ स्वत:च्या मालकीचे क्रिकेट स्टेडियम नव्हते. त्यामुळे उरली एकच जागा ती म्हणजे ब्रेबॉन स्टेडियम. पण यामध्येही एक अडचण होती. कारण त्यावेळी बॉम्बे क्रिकेट असोसिएशन आणि ब्रेबॉन स्टेडियम (Brabourne Stadium) ज्यांच्या मालकीचे होते त्या क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) मध्ये संबंध फारसे ठिक नव्हते. त्यावेळी CCI च्या प्रमुखपदी विजय मर्चंट (Vijay Merchant) होते.

शेषराव आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन विजय मर्चंट यांच्याकडे सामन्यासाठी परवानगी घेण्यासाठी गेले. मात्र विजय मर्चंटांनी परवानगी काही दिली नाही. विजय मर्चंट इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शेषरावांना “घाटी” असं संबोधले. याचे शेषरावांना वाईट वाटले आणि त्यांनी मराठी माणसाच्या हक्काचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेतला.

अशारितिने, अवघ्या 13 महिन्यांच्या कालावधीत 45 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या आणि मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमलाही मात देणाऱ्या“वानखेडे स्टेडियम” चा जन्म झाला. यामध्ये अभिमानाची बाब म्हणजे या स्टेडियमचे आर्किटेक्ट दुसरे तिसरे कुणी नसून आपलाच एक मराठी माणूस श्री. शशी प्रभू हे होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments