खूप काही

कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोवरची जोडी पुन्हा एकत्र येणार

प्रेक्षकांना आपले टेंशन विसरायला लावून निखळ हास्याची मेजवानी देणारा सोनी वाहिनीवरील सुपरहीट कार्यक्रम “द कपिल शर्मा शो” (The Kapil Sharma Show) 31 जानेवारी रोजी बंद झाला आहे. कार्यक्रम बंद झाल्यामुळे चाहते काहीसे नाराज झाल्याचे दिसून येत होते. मात्र आता चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. कपिल शर्मा शो जुलै महिन्यात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. या नविन पर्वात मात्र चाहत्यांना एक सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाच्या नविन पर्वात कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि सुनिल ग्रोवर (Sunil Grover) ही धमाल जोडी पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे. (Sunil Grover likely to return in The Kapil Sharma Show)

सलमान खानमुळे होणार शक्य

एका एंटरटेन्मेंट वेबसाईटच्या माहितीनुसार, अभिनेता आणि कपिल शर्मा शोचा प्रोड्यूसर सलमान खान (Salman Khan) कपिल आणि सुनिल या दोघांमधले मतभेद कमी करत त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. सुनिल कार्यक्रमात परत येण्यासाठी सलमान खान खूप प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.

कपिल-सुनिल यांच्यातील वादाचे कारण

मार्च 2017 मध्ये Kapil Sharma Show ची टीम ऑस्ट्रेलियाला एक कार्यक्रम करण्यासाठी गेली होती. भारतात परतत असताना कपिल शर्माने दारूच्या नशेत चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) या टिममधील कलाकाराशी त्याचा वाद चालू होता. तो वाद वाढू नये म्हणून सुनिल ग्रोवर त्यांच्यामध्ये पडला. ही गोष्ट कपिलला काही आवडली नाही.

त्यानंतर कपिलने सुनिलला शिवीगाळ केली आणि मारलं देखील. इतकंच नाही तर कपिलचा अली असगर (Ali Asgar) आणि किकू शारदा (Kiku Sharda) या दोघांसोबतही वाद झाला. यामुळे सुनिलला वाईट वाटले.

या घटनेनंतर कपिलने ट्विट करत सुनिलची माफी मागितली.

कपिलच्या त्या ट्विटला सुनिलने उत्तर दिले.

दरम्यान, ज्या गोष्टीची सर्व चाहते वाट पाहत होते त्याची वेळ आता जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच कपिल आणि सुनिल पुन्हा एकदा सोबत आपल्याला हसवण्यासाठी येणार आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments