खूप काही

IND vs ENG: अहमदाबाद येथील कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

भारत आणि इंग्लंड या दोन संघामध्ये सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईमध्ये खेळविण्यात आले होते. यामध्ये एक सामना इंग्लंडने तर एक सामना भारताने जिंकलेला आहे. दरम्यान, इंग्लंडविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. BCCI ने ट्विट करत ही घोषणा केली आहे. (Team India announced for two test matches against England slated to be played in Ahmedabad)

शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघामध्ये जास्त बदल नाही करण्यात आले आहेत. या सामन्यांसाठी भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला संघात स्थान देण्यात आलेले आहे. तर शार्दुल ठाकूर आणि शहबाज नदिम, विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार असल्यामुळे त्यांना संघातून वगळण्यात आलेले आहे.

शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), केएल राहूल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 24 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियम येथे खेळविण्यात येणार आहे. हा भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातील पहिला डे-नाईट सामना असणार आहे.

दरम्यान, भारताने आतापर्यंत दोन पिंक बॉल सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पहिला सामना इडन गार्डन्स येथे भारताने जिंकला होता, तर दुसरा सामना हा ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments