आपलं शहरकारण

Sandeep Deshpande: शिवसेनेचे ते ओपन सिक्रेट आहे, संदीप देशपांडेंचा टोला

मुंबई महानगरपालिकेचे 2021-22चे आर्थिक बजेट आज सादर होणार आहे. कोरोना आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष पालिकेच्या बजेटकडे लागले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सर्व मुंबईकरांचे कंबरडं मोडलेलं असताना आणि महानगरपालिकेची निवडणूकही तोंडावर असताना नेमक्या कोणत्या घोषणा पालिकेकडून केल्या जातात, हे पाहणे गरजेचे आहे.

आज सादर होणार्या अर्थसंकल्पाबाबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देत या अर्थसंकल्पातून काही अपेक्षा केल्या आहेत.

महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. निदान बेस्टचं विलीनीकरण करुन दिलेलं आश्वासन पुर्ण करावं ही आमची अपेक्षा आहे, असं ते म्हणाले. तसेच, 500 स्क्वेर फुटाच्या घरांना सत्ताधारी करमाफी देणार होते त्याचाही काही निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

“हे तर ओपन सिक्रेट आहे..”

मुंबई महानगरपालिकेत आज एका निनावी पत्राने खळबळ माजवली. या पत्रामध्ये महानगरपलिकेतील घोटाळ्याची माहिती आहे. याविषयी बोलताना संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

“मुंबई महानगरपालिकेमध्ये आलेले निनावी लेटर हे काही नवीन नाही आहे. त्यामध्ये असलेला मजकूरही काही नवीन नाही. हे ओपन सिक्रेट आहे की ठराविक कंत्राटदारांनाच कंत्राटं दिली जातात. या लेटरची नक्कीच चौकशी व्हावी”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, “विरपन्न गँगने महानगरपालिकेची लूट थांबवावी.” असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments