कारण

Budget 2021 : देशाच्या बजेटमधून महाराष्ट्राला वाटाण्याच्या आक्षता लावल्या

Union Budget  2021 : विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात आर्थिक त्रास कसा द्यायचं, याच उत्तम उदाहरण म्हणजे आजच आर्थिक बजेट आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी मांडली आहे. (The budget for 2021 was presented for political purposes – Hassan Mushrif)

अर्थमंत्री निर्मला सितारमण (finance minister Nirmala Sitharaman) यांनी महाराष्ट्राला वाटाण्याच्या आक्षता लावल्या आहेत, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याचा थकीत 38 हजार कोटींचा जीएसटी येणे बाकी आहे, तरी केंद्राकडून यावर काहीच बोलले जात नाही, असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

विरोधी राज्याला आर्थिक त्रास कसा द्यावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं बजेट आहे. निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये आर्थिक लयलूट केली आहे. या बजेटमध्ये महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आलाय, शेतकऱ्यांची पूर्णपणे निराशा करण्यात आली आहे. त्यामुळे हे बजेट राजकीय हेतूतून सादर केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments