खूप काही

महाविद्यालये उघडण्याची तारीख ठरली, पण नियमांमुळे विद्यार्थी बुचकळ्यात

शाळा सुरू झाल्याने आता कॉलेज कधी सुरू होतील याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आणि त्यात 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकलची दारे उघडता आता कॉलेज ची दारे कधी उघडतील याच्या प्रतीक्षेत सर्व विद्यार्थी डोळा लावून बसले होते. यावर राज्य सरकारचे उच्च शिक्षण मंडळ गेल्या काही दिवसांपासून बैठकी घेत लवकरचं आम्ही महाविद्यालय सुरू करू असे व्यक्तव्य ते वारंवार करताना आपल्याला दिसले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली असल्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालये सुरू करीत आहोत असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मुख्य म्हणजे महाविद्यालयात जरी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. महाविद्यालयाच्या उपस्थितिबाबत शिक्षण मंडळाकडून जी आर काढण्यात आला आहे. (The college will start from February 15)

महाविद्यालये सुरू होत असली तरी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन असे दोनही पर्याय उपलब्ध राहणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. म्हणजे जे विद्यार्थी काही कारणास्तव महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments