आपलं शहरकारण

आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचे आर्थिक बजेट होणार सादर

1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. त्यानंतर आता उद्या (3 फेब्रुवारी रोजी) आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका अर्थात मुंबई महापालिकेचे आर्थिक बजेट सादर होणार आहे. कोरोना आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष पालिकेच्या बजेटकडे लागले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सर्व मुंबईकरांचे कंबरडं मोडलेलं असताना आणि महापालिकेची निवडणूकही तोंडावर असताना नेमक्या कोणत्या घोषणा पालिकेकडून केल्या जातात, हे पाहणे गरजेचे आहे. यंदा मुंबईकरांवर कोणती नवीन करवाढ लादली जाणार आहे, याकडेही अनेकांचं लक्ष लागून असणार आहे.

आतापर्यंत केवळ 25 ते 30 टक्के महसूल पालिकेने जमा केला आहे, तसेच हॉटेल, जाहिरातदार आणि बिल्डरांच्या प्रिमियममध्ये पालिकेने सूटदेखील दिली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांवर यावर्षी कोणतीही करवाढ लादली जाणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहेत शक्यता
मालमत्ता करात वाढ होण्याची शक्यता

500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ होण्याची शक्यता

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बजेटचा आकडा 8 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यात

गेल्यावर्षी महापालिकेने 33 हजार 441 कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता

यंदा पालिकेच्या तिजोरीत आवक कमी आणि खर्च जास्त असल्याची परिस्थिती आहे, त्यामुळे उत्पन्नवाढीचे नवीन मार्ग शोधले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात घनकचरा व्यवस्थापन आणि इतर सेवांकरिता अतिरीक्त कर लावण्याची शक्यता आहे.

सेनेचा ड्रीम प्रॉजेक्ट म्हणून समजला जाणारा कोस्टल रोड प्रकल्पासाठी भरीव तरतूद या बजेटमध्ये केली जाऊ शकते, कोस्टल रोडचे काम 2023 पर्यंत पुर्ण होणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे या प्रकल्पासाठी मोठी तरतूद करण्याची शक्यता आहे.

बेस्टला मदत अपेक्षित
मुंबईची जीवनवाहिनी असलेली बेस्ट सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिका मोठी मदत देईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. आतापर्यंत जवळपास अडीच हजार कोटींची मदत बेस्टला करण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments