फेमसखूप काही

काळा घोडा फेस्टिव्हल पहिल्यांदाच होणार ऑनलाइन; ‘हे’ स्टॉल ही लागणार ऑनलाइन

नवीन वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिना सुरू झाला की सगळ्या कलाप्रेमींना आणि शालेय, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असते ती म्हणजे काळा घोडा फेस्टिव्हल ची.

सालाबादप्रमाणे गेली 21 वर्ष चालत आलेली ही मुंबईची प्रथा सुदैवाने यावर्षीही चालणार आहे फक्त एका वेगळ्या अंदाजात. यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काळा घोडा फेस्टिव्हल ऑनलाइन पद्धतीने साजरा केला जाणार आहे. (This Year Kala Ghoda Festival will be celebrated online)

मागील 21 वर्षांपासून काळा घोडा असोसिएशनतर्फे मुंबईतील काळाघोडा परिसरात काळा घोडा फेस्टिव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वेगवेगळ्या राज्यातून आपली खासियत दर्शविण्यासाठी विक्रेते, कलाकार आपले स्टॉल लावत असतात. दरवर्षी काळा घोडा फेस्टिव्हलची एक थीम असते आणि त्यानुसार संपूर्ण फेस्टिव्हल आयोजित केला जातो.

यावर्षी पहिल्यांदाच हा महोत्सव ऑनलाइन साजरा केला जाणार आहे. येत्या 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव होणार असून यामध्ये मनोरंजन आणि नेत्रसुखी पर्वण्या रसिकांना मिळणार आहे. यामध्ये गायन व नृत्यावर आधारित परिसंवाद, सिनेमा, थिएटर, कार्यशाळा, संगीताचे विशेष कार्यक्रम, हास्यकला, साहित्य, पुस्तक प्रकाशन आणि मोठ्या दिग्गजांना मानवंदना देखील दिल्या जाणार आहेत. नऊ दिवस रंगणारा हा फेस्टिव्हल पहिल्यांदाच ऑनलाइन होत असल्याने मुळात स्वरूप कसे असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे काळा घोडा असोसिएशनतर्फे दिलेल्या माहितीनुसार या फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच ऑनलाइन स्टॉल उभे राहणार आहेत. 6 फेब्रुवारीला सुरू होणारे हे स्टॉल पुढे महिनाभर सुरू राहणार असल्याची देखील माहिती आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments