आपलं शहर

VIDEO : चल बे फंटर, लोकल सुरु होताच स्टंटबाजांचा धुमाकुळ सुरु

मुंबईतील स्टंटबाज पावलोपावली पाहायला मिळतील, त्यात लोकल सुरु झाल्यानंतर तिथले स्टंटसम्राट वेगळेच. 1 फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल (Mumbai Local) सर्वांसाठी सुरु झाली. त्यानंतर अनेक शांत बसलेले स्टंटबाज पुन्हा कामाला लागले. असाच एक प्रकारचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (The stunt resumed as soon as the Mumbai local started)

मुंबई लोकल ट्रेन सर्वांसाठी खूली झाल्यानंतर ट्रेनमधील स्टेटबाजांचा सुळसुळाट पुन्हा सुरु झाला आहे. अंबरनाथहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (Ambernath To Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) जाणाऱ्या ट्रेनमध्ये हा प्रकार घडला आहे. सायन ते दादर दरम्यान आज (07 फेब्रुवारी रोजी) सकाळी 9.30 वाजता ही घटना घडल्याचे समजत आहे.

असे अनेक स्टंटबाज मुंबई लोकलच्या तिन्ही लाईनवर पाहायला मिळतील. मुंबई पोलिसांकडून योग्य ती दखल घेऊन तात्काळ कारवाई केली जाते. मात्र एकावर कारवाई केल्यानंतर दुसरा स्टंटबाज समोर येतो, हेदेखील तितकंच खरं आहे. त्यामुळे अशा स्ंटटबाजांवर योग्य ती कारवाई करुन, असे गुन्हे पुन्हा होणार नाहीत, याप्रकारची तरतूद करावी लागेल, हे नक्की.

सर्वांसाठी लोकल सुरु, मात्र…
1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुर करण्यात आली आहे. याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. दिवसातील 3 टप्प्यांमध्ये ही सेवा पुरवली जात आहे.

मुंबई लोकलचा प्रवास संर्वांसाठी दिवसभर शक्य नाही. तर पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत ही लोकलसेवा सर्वांसाठी सुरु असेल. त्यानंतर सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरीक लोकलचा प्रवास करु शकतील. दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पुन्हा सगळेजण प्रवास करु शकतील, तर पुन्हा संध्याकाळी 4 रात्री 9 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सुविधेतील प्रवासी प्रवास करु शकतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments