फेमस

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘Toolkit’चा ‘हा’ आहे उलगडा; वाचा थोडक्यात

शेतकरी आंदोलन हे कोरोनानंतर बहुचर्चित विषय बनला आहे. कंगना रनौत च्या विधानावरून आता हे प्रकरण टूलकीटवर येऊन पोहोचल आहे. यात आता सोशल मीडियावर दिशा रवी या ऍक्टिव्हिस्टला टूलकीट प्रकरणात अटक केल्याच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत. आता या सगळ्या प्रकरणात टूलकीट हे काहींसाठी जरा नवीन आहे. त्यामुळे नेमकं चर्चेत असणार टूलकीट आहे तरी काय आज हे आपण पाहणार आहोत. (What is Toolkit)

टूलकीट म्हणजे नेमकं काय?

टूलकीट हे आंदोलनाशी जोडले गेलेले असते हे आपल्याला आता कळतं आहे. कुठलंही जनआंदोलन उभं राहताना आंदोलनाचा नेमका काय उद्देश आहे, आंदोलनाचा एकूण कार्यक्रम, एकूण परिस्थिती, पुढील पावले, आंदोलनाची दिशा, घोषणा, आंदोलनाची ठिकाणे, अश्या सगळ्या गोष्टी आंदोलक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवायच्या असतात. आधी कस होत, ही सगळी माहिती असलेली पत्रक किंवा पोस्टर छापली जायची. पण आता या आधुनिक काळात आंदोलनाचा प्रसार बॅनर, पोस्टर सोबत ऑनलाइन मद्यमातून देखील मोठ्या प्रमाणात होतो. आता तो होतो टूलकीटच्या मदतीने.

टूलकीट मध्ये काय असत?

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर टूलकीटमध्ये आंदोलनाची संपूर्ण माहिती असते. याशिवाय, आंदोलनासाठी कोणते हॅशटॅग वापरावे, कधी वापरावे, कोणते फोटो वापरावे, कोणत्या सेलेब्रिटिंना टॅग करावे जेणेकरून याचा जास्त प्रसार होईल याकडे विशेष लक्ष देत हे टूलकीट बनविले जाते. आता हे टूलकीट ऑनलाइन कागदावर म्हणजेच गुगल शीट किंवा गुगल डॉक यावर दिली असते. आणि ही माहिती एडिट करण्याचे हक्क हे आंदोलनाच्या महत्वाच्या व्यक्तींकडे असतात.

थोडक्यात सांगायचं झालं तर, जस प्रेस कॉन्फरन्स मध्ये शेवटी निवेदन पत्र दिल जात ज्यात सगळी महिती असते. तसंच आंदोलनाचं माहिती देणार किंवा निवेदन देणार पत्र म्हणजे टूलकीट असत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments