कारण

Budget 2021 : केंद्राचा बिग’सेल’; या कंपन्या काढल्या विक्रीला

Union Budget 2021 सादर झाल्यानंतर सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, यामध्ये परकीय गुंतवणूक, स्वदेशी गुंतवणूक, अनेक प्रकल्पांची उभारणी तसेच अनेक कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. (Budget 2021: Central Government Big Cell; These companies removed the sale)

2021-22 च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने काही सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याअंतर्गत निर्गुंतवणूक करुन 2 लाख कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा असल्याची अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी माहिती दिली आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अनेक सरकारी कंपन्या विकल्या जातील आणि त्यातून आपलं निर्गुंतवणुकीकरण केलं जाईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना दिली आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसह (BPCL) अनेक कंपन्यांचा समावेश या विक्रीच्या करारामध्ये आहे.

2021-22 च्या आर्थिक वर्षात BPCL, एअर इंडिया, कॉनकोर आणि SCI मधील भांडवलाचं निर्गुंतवणुकीकरण करण्यात येईल. म्हणजेच या कंपन्यांमधून सरकार आपला वाटा काढून घेईल, सोबतच भारतीय विमा कंपनीचा (LIC) आयपीओ (Initial Public Offer) आणण्याचं पुढील वर्षी नियोजन आहे.

IDBI बँकेसोबत इतर 2 बँकेचे खासगीकरण होणार आहे. शेअर बाजारातील अनेक व्यवहार खासगी केले जातील, या सगळ्यांचे काम येत्या 2022 मध्ये केलं जाईल, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments