आपलं शहर

लसीकरणाचा तिसरा टप्पा, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारतातील कोरोना विषाणू वर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण देशभरात 16 जानेवारी पासून लसीकरणाच्या भव्य मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात दोन टप्प्यात जवळपास सव्वा पाच लाख लोकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी या कोरोना काळात लोकांची सेवा केली त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस दिली गेली. आता मार्च महिन्यात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्याची आरोग्यमंत्री टोपे यांनी शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच केंद्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार राज्यात लसीकरण होत आहे आणि लसीकरणाचे अद्याप कोणतेही साईड इफेक्ट झाले नसल्याचा दावा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी केला. म्हणून त्यांनी सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या 37 हजार 720 जणांवर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments