खूप काहीफेमस

लॉकडाऊनमध्ये या 15 वर्षीय मुलाने तयार केली इलेक्ट्रिक बाईक!

2020 हे वर्ष जगभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एका मोठ्या सुट्टीपेक्षा कमी नव्हते. या संपूर्ण सुट्टीत लहान मुलांनी खूप मज्जा केली, कॉम्प्यूटर गेम्स खेळले. मात्र, याला अपवाद ठरला बेळगावचा एक पंधरा वर्षांचा मुलगा. बेळगावच्या निप्पाणीमध्ये राहणारा प्रथमेश सुतारा (Prathamesh Sutara) या मुलाने स्वत: एक इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. या इलेक्ट्रिक बाईकवर तुम्ही एकदा चार्चिंग केल्यानंतर 40 किलोमीटर पर्यंत याचा वापर करू शकता.

लॉकडाऊनमध्ये प्रथमेशला काहीतरी हटके, क्रिएटिव्ह करायचे होते. त्यानुसार त्याने आपल्या आई-वडिलांना एक इलेक्ट्रिक बाईक तयार करण्याविषयी बोलला. प्रथमेशचे वडिल प्रकाश सुतारा (Prakash Sutara) जे स्वत: एक इलेक्ट्रिशन (Electrician) आहेत त्यांना आपल्या मुलाची ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी प्रथमेशला लगेच होकार दिला. प्रथमेशला त्याच्या कुटुंबाकडून खूप सपोर्ट मिळाला.

प्रथमेशने बाईक बनविण्यासाठी लागणारे पार्ट कचर्यातून शोधून काढले. त्याचे वडील इलेक्ट्रिशन असल्यामुळे त्याला त्यांच्या गॅरेजमधूनच बहूतेक सामान मिळाले. त्यानंतर प्रथमेशने 48 वोल्टेजची Lid Acid Battery तयार केली. त्यासोबतच त्याने 48 वोल्टेज आणि 750 वॉट अशी प्रत्येकी एक-एक मोटार आणि एक इलेक्ट्रिक रिचार्जेबल मोटार (Electric Rechargable Motor) तयार केली.

प्रथमेशला ही बाईक तयार करण्यासाठी इंटरनेटची खूप मदत मिळाली. त्याने इलेक्ट्रिक बाईक तयार करण्यासाठी इंटरनेटवर रिसर्च केला आणि ही बाईक बनवली. विशेष म्हणजे प्रथमेशला ही बाईक तयार करण्यासाठी केवळ 25 हजार रुपयांचा खर्च आला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक बाईकच्या किंमतीपेक्षा प्रथमेशने तयार केलेली बाईक खूपच स्वस्त आहे.

त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे कुटुंबीय खूपच खूष आहेत. आपल्या मुलाचा अभिमान वाटतो अशी प्रकाश सुतारा यांची भावना आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments