खूप काही

दिवसभरातील टॉप 3 बातम्या, मुंबई लोकलबद्दलही मोठा निर्णय…

विधानसभा, लोकसभा किंवा कुठलीही निवडणूक नस्तनाही राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. पुणे इथे पूजा चव्हाणच्या (pooja chavhan) आत्महत्येमुळे भाजप जास्तच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (BJP state vice president Chitra Wagh) यांनी आपल्या बोलण्यात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव पूजा चव्हाण प्रकरणात अडकवल्यामुळे या वादाला नवं वळण आले आहे. चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

वाढत चाललेल्या पूजा चव्हाण प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी माहिती घेतली आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काळात वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Forest Minister and Shiv Sena leader Sanjay Rathore) यांचा हात या प्रकरणात आहे का, हेदेखील तपासले जाण्याची शक्यता आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी पूजा चव्हाण प्रकरणातील व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून कारवाई करावी, अशा प्रकारचे पत्र पोलीस संचालकांना दिलं आहे, सोबतच चंद्रकांत पाटील यांनीही हा मुद्दा पोलिसांसमोर उचलून धरल्याने पोलीस कोणती भूमिका घेतात, हे पाहणे गरजेचे असेल.

1 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मुंबई लोकलबद्दल (Mumbai Local Update) सर्वात मोठी माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसात सर्वांसाठी सुरू झालेल्या लोकलमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई लोकल सर्व नागरिकांना सुरू केल्यानंतर गर्दीचे प्रमाणही वाढले आहे, परिणामी नियंत्रणात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. मुंबई पालिकेने सादर केलेल्या माहितीच्या आधारावरून ही बाब स्पष्ट झाली आहे, त्यामुळे येत्या काळात मुंबई लोकलबद्दल काय निर्णय घेतला जातोय, हे पाहणे गरजेचे असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments