कारण

Rohit Pawar : भाजपचे उथळ नेते आपले संस्कार दाखवून देतात, रोहित पवार भडकले…

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रटीनी केलेल्या ट्विट ची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगताच भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी कोरोनावरून देशमुख यांची टिंगल उडवली. कोरोनामुळे मेंदूवर परिणाम झाला असल्याचे त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले होते.  (Tweet war between Atul Bhatkhalkar and Rohit Pawar)

भातखळकर यांच्या अशा ट्विटवर नाराजी व्यक्त करत रोहित पवार यांनी अतुल भातखळकर यांना चांगलंच निशाण्यावर धरलं आहे. रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांच्या अशा खकोडसाळ व्यक्तव्याने त्यांच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

“ विद्वान व्यक्ती नम्र असते अन पोकळ व्यक्ती उथळ पाण्यासारखं खळखळ करते! भाजपाच्या नेत्यांसह अनेकांना कोरोना झाला, तेव्हा त्यांना बर होण्यासाठी आम्ही शुभेच्छा दिल्या. भाजपाचे उथळ नेते शुभेच्छा देतच नाहीत, पण कोरोनामुळे मेंदूवर परिणाम होत असल्याचं बरळत आपले संस्कारच दाखवून देत आहेत.”  असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. 

दिल्लीत चालू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचे प्रतिसाद देशाच्या अंतरंगातही उमटताना दिसत आहेत. अनेक क्षेत्रातून लोक ट्विटर च्या माध्यमांतून आपले मत सर्वांसमोर मांडत आहेत. याच संधर्भात काँगेसने ट्विट प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments