फेमसखूप काही

Twitter War : सेलिब्रेटींच्या ट्विटवरून घमासान, शेतकऱ्यांवर ट्विट करणं पडलं महागात…

काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार आणि अश्या अनेक बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील दिगाजांनी दिल्ली मध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत ट्टविट केले होते. त्या ट्विटवर देशभरातून प्रतिक्रिया आल्या, काही चांगल्या तर काही वाईट.पण आता त्या ट्विट बाबत सगळ्या दिगज्जांची विचापुस केली जाणार आहे.

शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत केलेल्या ट्विट मुळे महराष्ट्रातात नवीन वादविवाद चालू झाला आहे. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि अनेक दिग्गजांनी देशाला एकजूट ठेवण्याचे ट्विट केले होते. महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सगळ्या ट्विटची पाहणी करण्याचा आदेश दिला आहे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयाला अपमानास्पद असल्याचे सांगितले.”भारतरत्न असलेल्या दिग्गजांच्या नावापुढे विचारपूस या शब्दाचा वापर करण्याआधी लाज वाटली पाहिजे. त्यांच्या ट्विट ची पाहणी करायला संगणाऱ्यांच्या मानसिक स्थितीची पाहणी करणे गरजेचे.”

या लिस्ट मध्ये विराट कोहली, कंगना रनोट, अक्षय कुमार, अजय देवगन यांचही नाव आहे. महाराष्ट्र सरकारला शंका आहे की त्यांनी हे ट्विट केंद्र सरकारच्या दबावाखाली केले आहेत असा दावा काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांच म्हणणं आहे की सगळ्या ट्विट मध्ये समानता आहे. “प्रपोगांडा” आणि “युनिटी” सारखे समान शब्द वापरले होते. आम्हाला शंका आहे की ह्या मागे भाजपा असू शकते. जर भाजपा आपल्या राष्ट्र नायकांना घाबरवत आहे तर त्यांना सुरक्षा दिली पाहिजे. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments