कारण

Udayanraje Bhosale Live : मराठा आरक्षणाबाबत उदयनराजे भोसले यांचं मोठं विधान

मराठा आरक्षणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे आज मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुप्रीम कोर्टाचे वकिलही उपस्थित होते. त्या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

ज्याप्रकारे इतर सर्व समाजांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला. त्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणं ही केवळ माझीच नाही तर सर्व पक्षांची ही नैतिक जबाबदारी आहे, असं उदयनराजे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात 70 टक्के मराठा समाज हा मागास आहे. तमिळनाडूमध्ये जे शक्य झाले ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण देण्याबाबत इच्छाशक्तीचा अभाव आहे अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी उदयनराजेंनी केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments