कारण

कशात काही नाही, आणि… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विरोधी पक्षनेत्यांना चपराक

मला विरोधी पक्षांच्या नेत्यांची किव वाटते, विरोधी पक्ष नेत्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यात त्यांनी कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला, मात्र राज्यात ज्या ज्या वेळेला सरकारने काम केले आहे, ते जनतेसमोर आहे, त्यांनी सरकारवर टीका करणे म्हणजे कोव्हिड योद्ध्यांवर टीका करणे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Chief Minister Uddhav Thackeray slaps the Leader of Opposition)

कशात काही नाही आणि आरोप करत सुटायचं ही आता पद्धत झालीय, असा दुतोंडी विरोधीपक्ष महाराष्ट्राने या आधी कधी अनुभवला नाही, इतरही काही आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेत त्या सर्वाची उत्तरं देणार नाही, असा टोलादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

सावरकरांची जयंती की पुण्यतिथी हे आधी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ठरवावं, अशी चपराक ठाकरे यांनी लगावली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवर बोलताना ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. कर्नाटकात तुम्ही आहात, केंद्रातही तुम्ही आहात, त्यामुळे सीमाप्रश्न का सोडवला नाही, असा आरोप त्यांनी करणं चुकीचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नुसते आरोप करणं म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात, अशी परिस्थिती विरोधी पक्षांची झाली आहे. मराठा आरक्षणावरही ते बोलत होते, त्यांनी मदतीचं आश्वासन दिलंय मी धन्यवाद देतो, असा टोला फडणवीसांना लगावला आहे.(Chief Minister Uddhav Thackeray slaps the Leader of Opposition)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments