खूप काही

Nirav Modi: भारताच्या लढ्याला यश; नीरव मोदीच्या प्रर्त्यपणाचा मार्ग मोकळा..

पंजाब नॅशनल बँकेतील (Punjab National Bank) 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार घोषित करण्यात आलेल्या नीरव मोदीच्या भारत प्रत्यर्पणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने आज हा महत्वपूर्ण निकाल भारताच्या बाजूने दिला आहे.

कोर्टाने निकाल देताना असे म्हटले आहे की नीरव मोदीने (Nirav Modi) पुरावे नष्ट करण्याचा आणि साक्षीदारांना घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. कोर्टाने नीरव मोदीला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आर्थर रोड जेलमध्ये मोदीला योग्य ती मेडिकल ट्रिटमेंट पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

तब्बल दोन वर्षे चाललेल्या या न्यायालयीन लढ्यात अखेर भारताला यश मिळाले आहे. जज सैम्यूल गूजी यांनी हा निकाल देत नीरव मोदीच्या भारत प्रत्यापर्णाचा मार्ग मोकळा केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments