खूप काहीकारण

मच्छीमारांचे बुरे दिन, कोरोनाचे परिणाम आजही भोगतोय मच्छिमार बांधव

भाऊ चा धक्का म्हंटल की डोळ्यांसमोर उभ राहत ते सुख्या आणि ओल्या मास्यांनी भरलेला बाजार. मासे खाणाऱ्यांसाठी तर हा एक मेळावाच असतो. दरदिवशी मासे विक्री- खरेदी करण्यासाठी इथे खूप मोठ्या
प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.पण गेल्या आठवड्यात या गजबजणाऱ्या बंदरावर फारशी गर्दी दिसून आली नाही. नेहमी पेक्षा निम्म्या संख्येने बोटी बंदरावर असलेल्या दिसल्या.

कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील मत्स्यव्यसायाला खूप मोठ नुकसान झालं आहे. चीन हा भारतसाठीचा सर्वात जवळचा आणि मत्स्यव्यवसायसाठीचा मोठा बाजार परंतु कोव्हीड १९ च्या नवीन कायद्यांमुळे मास्यांची निर्यात आणि भाव कमी झाले आहेत. तसेच पैश्यांची थकबाकी आणि डिझेल च्या वाढत्या किमती यांमुळे निर्यात घटत आहे.

महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी सांग लिमिटेड चे सभापती रामदास संधे यांच्या म्हणण्या नुसार २०१९ च्या चक्रीवादळा नंतर चे सलग दुसरे वर्ष आहे जे मच्छिमारांसाठी अत्यंत वाईट आहे.

महाराष्ट्रा सहित गुजरात आणि कर्नाटक सुद्धा या संकटास तोंड देत आहे. गुजरात मधील अनेक मासेमारी करणारी जहाज अजूनही बंद आहे. चीन भारतातून होणाऱ्या मत्स्यव्यवसायावर २५% निर्यात कर आकारत परंतु देशाच्या पश्चिमी किनारपट्टीवरून म्हणजेच गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक मधुन होणाऱ्या निर्याती वर ५०% कर आकारण्यात येतो.

मच्छीमारांचे हे वाईट दिवस लवकरच संपतील आणि या व्यवसायाला भरभराटीचे दिवस लवकरच येऊन देशाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल हीच अशा

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments