कारण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा; ऑपरेशन लोटसकडे सगळ्यांचे लक्ष…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज (7 फेब्रुवारी रोजी) महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. भाजपा खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्याच्या निमित्ताने अमित शहा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

आज दुपारी अमित शहा यांच्या हस्ते नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचा उद्घाटन सोहळा पार पडेल. व यानंतर अमित शहा हे गोव्याला जाण्यासाठी मार्गस्थ होतील.

यापूर्वी अमित शहा हे शनिवारी ६ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार होते. मात्र शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनाची घोषणा झाल्यामुळे त्यांचा दौरा एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला.

या कार्यक्रमाला अमित शहा यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आणि जिल्ह्यातील आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने भाजपच्या ऑपरेशन लोटसकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Union Home Minister Amit Shah’s visit to Maharashtra; Everyone’s attention to Operation Lotus …)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments