कारणआपलं शहर

लोकलकरांसाठी खुशखबर लवकरच प्लॅटफॉर्मवर येत आहे !

प्रवाशांच्या गैरसोईमुळे होणाऱ्या नाराजीला लक्षात घेऊन राज्यसरकार कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर लवकरच नवीन निर्णय घेणार आहे. (Upcoming decision about Local train)

या महिन्या पासून लोकल सेवा सर्वांसाठी सुरु करण्यात आली आहे. परंतु वेळमर्यादेमुळे अजूनही बऱ्याच लोकांना पूर्णपणे या सेवेचा उपयोग होत नाही आहे. सकाळी पहिल्या गाडीपासून सात वाजेपर्यंत, दुपारी १२ ते ४ आणि रात्री ९ नंतर सर्वांसाठी रेल्वे सुरु करण्यात आली आहे. परंतु ज्यांची कार्यालय सकाळी उशिराने असतात त्यांना अजूनही प्रवासाचा प्रश्न आहेच.

 यावरच आज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश कांकणी यांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. लोकल ट्रेन सोबतच सर्व व्यवहार पूर्वीसारखेच सुरळीत होणे हे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर अवलंबून आहे. रेल्वे सुरु होऊन आठवडा झाल्यावरही ही संख्या वाढली नसल्याचे लक्षात आले आहे. पुढील १५ दिवस जर अशीच परिस्थिती राहिली तर लोकल ट्रेनच्या सध्याच्या वेळा पत्रकात बदल केले जातील असे काकणी म्हणाले. 

मुंबईतील नायर रुग्णालयात कांकणी यांनी लस टोचून घेतली. यानंतर एका वृत्तवाहिनीशी संपर्क साधताना त्यांनी ही माहिती दिली. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था पूर्णपणे दक्षता बजावत आहे. लसीकरण ही मोठ्या प्रमाणात सुरु झालं आहे. योग्य खबरदारी घेऊन आपण कोरोना साखळी मोडू शकतो आणि सर्व गोष्टी पुन्हा पूर्वपदावर आणू शकतो. रेल्वे प्रमाणेच सर्वकाही लवकरच पुन्हा पहिल्या सारखं होईल हीच अशा.  

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments