खूप काही

UPSC परीक्षार्थींसाठी खुशखबर; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC ची नागरी सेवा (Civil Services) परीक्षार्थींसाठी एक खुशखबर आहे. UPSC Civil Services परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देणार असल्याचे सरकारने मंजूर केले आहे. कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये ही परीक्षा ज्यांनी दिली नव्हती त्यांना आता केंद्र सरकारने एक संधी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसवी राजू यांनी सांगितले की, “केंद्र सरकारने या विषयावर विचार केला आणि ही गोष्ट मान्य करीत आहेत की ऑक्टोबर 2020 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शेवटचा अटेंप्ट दिला होता, त्यांना आणखी एक संधी दिली जाईल.” तसेच, केंद्राचे असेही म्हणणे आहे की हा शेवटचा अटेंप्ट देणार्या विद्यार्थ्यांची वयाची सीमा पार नाही झाली पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने असंही नमूद केले आहे की ही संधी दिली गेली आहे ती 2021 च्या परीक्षेदरम्यान लागू होईल आणि त्यानंतर नाही. कोविड काळात शेवटचा अटेंप्ट दिलेल्या विद्यार्थ्यांना ही वन टाईम सूट आहे.

दरम्यान, हा निर्णय उमेदवार रचना सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आहे. कोविड काळात बरेचसे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. तसेच प्रतिकुल परिस्थितीमुळे अनेक उमेदवार चांगल्या रितीने परीक्षा देऊ शकले नाही. परिणामी त्यांना परीक्षेत उत्तीर्ण होता आले नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात यावी अशा आशयाची याचिका रचना सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments