खूप काही

Uttarakhand Glacier Burst : 300 मीटर बोगद्यात असूनही वाचलो, उत्तराखंडमधला थरार एकदा पहाच…

उत्तराखंडच्या चामोली मध्ये ग्लेशियर फुटल्यामुळे खुप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.अजूनही काही लोग दुर्घटनेच्या ठिकाणी अडकले आहेत, ज्यांना बाहेर काढण्यासाठी रेसक्यु ऑपरेशन चालू आहे. या दरम्यान खूप लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय.चमोलीच्या दुर्घटनेत वाचलेल्या लोकांनी सांगितला त्यांचा दुर्दैवी प्रसंग.चामोलीच्या धाक गाव मध्ये राहणाऱ्या सूरजने सांगितला की दुर्घटनेच्या वेळी एक जोरात आवाज आला आणि आम्ही प्रोजेक्ट साइट वर अडकलो.

ढाक गावच्या सुनीलने सांगितले की “आम्ही बोगद्याच्या आत काम करत होतो.अचानक लोकांनी ओरडायला सुरुवात केली की बाहेर या बाहेर या. आम्ही घाबरलो की काय झालं असेल आणि तेव्हा अचानक बोगद्यात पाणी घुसल आणि आम्ही अडकलो. आम्ही बोगद्याच्या आत 300 मीटर होतो आणि लोखंडी सळीच्या मदतीने बसून राहिलो.”

सुनील आणि त्यांचे साथीदार जे बोगद्यात अडकले होते त्यांना अस वाटल की ते परत कधी त्यांच्या कुटुंबाला भेटू शकणार नाहीत. श्वास घेणही कठीण होत होतं. एका वर्कर जवळ फोन होता ज्याने बाहेर सूचना दिली आणि मग हळू हळू पाणी कमी झालं मग आईटीबीपी आणि एनडीआर एफच्या टीमने रेसक्यु केलं.

चमोली मध्ये ग्लेशियर फुल्यांच्या नंतर पाण्याच्या जलद प्रवाहाने रैना गावाच्या जवळचा ऋषी गंगा हाइड्रोपावर प्रोजेक्टच नुकसान झालं आणि एनटीपीसी च्या पॉवर प्रोजेक्टच पण नुकसान झालं. आयटीबीचे प्रो विवेक पांडे यांनी सांगितले की दुसऱ्या बोगद्यात 30 लोक अडकल्याची शक्यता आहे आणि आमची टीम रात्रभर काम करणार आहे. 

एनडीआरएफने सांगितलं की ही दुर्घटना केदारनाथ इतकी मोठी नाहीये.रेसक्यु ऑपरेशन रात्रंदिवस चालू असेल. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय कंट्रोल रूम मध्ये बसून सगळ मॉनिटर करत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments