कारणफेमस

नितेश राणेंनी दिल मुख्यमंत्र्यांना व्हॅलेंटाईन गिफ्ट; गिफ्टमध्ये ‘7’ हे मेन कार्यकर्ते

कोकण हा राणेंचा बालेकिल्ला समजला जात असताना आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बालेकिल्ला फुटल्याच्या चर्चांना उधाण येत होते. याचं स्पष्टीकरण मिळाले असून निलेश राणेंचा बालेकिल्ला समजली जाणारी सिंधुदुर्गतील कार्यकर्ते आता सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आमदार नितेश राणेंच्या बालेकिल्ल्याला अतुल रावराणेंनी सुरुंग लावला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नगरपंचायतीतील 3 माजी नगराध्यक्षासह एकूण 7 राणे समर्थक नगरसेवकांचा आज (9 फेब्रुवारी) मातोश्रीवर सायंकाळी 6 वाजता मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. (Nilesh Rane’s Ballekilla start leaking)

20210209 123548

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आपला रोख जमविण्यासाठी कंबर कसताना दिसत आहे. इतर पक्षातील बडे छोट्या नेत्यांची फोडणी करण्याचे काम शिवसेना चांगल्याचं प्रकारे करताना पहायला मिळत आहे. मनसे आणि भाजपाचे अनेक नेते सत्ताधारी शिवसेनेत आल्याने शिवसेनेचं पारडं भारी भक्कम झालय अस म्हटलं तरी यात वावग ठरणार नाही. यातच आता भाजपाच्या आमदार नितेश राणेंच्या बालेकिल्ल्याला गळती सुरू झाली असून अतुल रावराणेंकडून जोर का झटका लागला आहे.

अतुल रावराणेंनी केलेल्या राजकीय भूकंपामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असुन राणे कुटुंबीयांच्या साम्राज्याला जबरदस्त झटका बसला आहे. वैभववाडी तालुका आणि नगरपंचायतीवर एकहाती सत्ता असल्यामुळे खासकरून वैभववाडी शहर हा आमदार नितेश राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेना नेते अतुल रावराणेंनी आमदार राणेंच्या या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावल्याने एकाएकी या किल्ल्याची तटबंदी पार उद्ध्वस्त झाली आहे.

वैभववाडी नगरपंचायतीतील सात नगरसेवकांचा आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधुन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. वैभववाडी नगरपंचायतीतील श्री. रवींद्र रावराणे, श्री संजय चव्हाण, सौ. दिपा दिपक गजोबार, सौ. संपदा शिवाजी राणे, श्री. रवींद्र तांबे, श्री. संतोष पवार व श्री. स्वप्निल इस्वलकर हे सात नगरसेवक शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेणार आहेत.

यासर्व प्रकरणावर भाजप आमदार नितेश राणे बोलतात की, 7 नगरसेवक शिवसेनेकडे जातायत आम्ही वाचलेलं ऐकलेलं आहे. आमचं शिवसेनेवर जून प्रेम आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना काय भेट वस्तू दिली तर ते घेणार नाहीत, पुष्पगुच्छ दिले स्वीकारणार नाहीत. आमच्या हॉस्पिटल च उदघाटन झालं तेव्हा नारायण राणे साहेबांनी एका फाईलसाठी कॉल केला होता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानिमित्ताने हे 7 नगरसेवक भेट म्हणून पाठवत आहोत. व्हॅलेंटाईन जवळ येतोय त्याची भेट म्हणून स्वीकारावे.

नुकतेच नारायण राणे यांनी बांधलेल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोकणात आले होते. यावेळी त्यांनी भाजपा पक्ष बळकट असल्याचे सांगत शिवसेनेवर घणाघाती टीका केल्या होत्या. अमित शाह यांचं कोकणातलं पहिलाच भाषण एकदम तडाखेबाज झालं होतं. यावरून भाजपा स्ट्रॉंग आहे असं चित्र स्पष्ट होत असतानाच त्याच ठिकाणच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करून भाजपाच्या एकजुटीवर पुन्हा एकदा राजकीय चौकटीत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments