खूप काही

‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त फसवणूक करणारे खोटे मेसेज व्हायरल; बळी न पडण्याचे पाेलिसांचे आवाहन

फेब्रुवारी महिन्यातील पहिला आठवडा आला की तरुणांना वेड लागते ते व्हॅलेंटाईन डे चे ! मात्र याच व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने फेक मॅसेजेस सध्या व्हायरल होत आहे. या मेसेजमुळे फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात असून ठाणे पोलिसांची सायबर टीम कामाला लागली आहे.

व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर अनेक ऑफर देणारे मेसेजेस आपल्याला येत असताना, असाच एक मेसेज सध्या मोबाईलवर व्हायरल होत आहे. ऑफर च्या नावाखाली एका लिंकद्वारे लोकांची फसवणूक केली जात असल्याचे ठाणे पोलिसांना समजले आहे.

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अनेक तरुण तरुणींना त्याच्या मोबाईल वर ताज सारख्या पंचतारांकित हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये 7 दिवसांची विकेंड ऑफर मिळणार असल्याचे फेक मेसेज व्हायरल झाल्यामुळे ठाणे पोलीस सावध झाले असून येणाऱ्या कोणत्याही संदेशकडे लक्ष देऊ नका आणि कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका असे आवाहन ठाणे सायबर पोलिसांनी केले आहे.

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने फ्री गिफ्ट कार्ड, आणि फ्री कुपन मिळत असल्याची लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ताज हॉटेल मध्ये राहण्यासाठी कार्ड तसेच डी मार्ट मध्ये फ्री शॉपीग मिळत असल्याचा संदेश सार्वत्रिक पसरला आहे. या वेबसाईटवर गिफ्ट कार्ड तसेच ओके क्लिक केल्यावर दुसरे पेज ओपन होते , तिथे काही प्रश्न विचारले जातात . त्याची उत्तर दिल्यानंतर आणखीन एक पेज ओपन होते जिथे बारा बॉक्स दिसतात. या वरती क्लिक केल्यावर काही गिफ्ट कार्ड जिंकता येतात. त्याचबरोबर हा मेसेज इतर पाच ग्रुप आणि 20 लोकांना पाठवण्यास सांगितले जाते.

व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून मोफत स्कीम चे आमिष दाखवून एखादा संदेश आल्यास त्यातील लिंक वर क्लिक करून स्वतःची माहिती भरू नये तसेच या संदर्भात कोणत्याही अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास त्याला बँक खात्याचा तपशील किंवा अन्य कोणत्याही वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

पुण्यात काही नागरिकांना असे मेसेजेस पाठवून फसवणूक करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. ठाण्यात देखील असे मेसेजेस अनेकांना येत असून कोणीही या लिंक वर क्लीक करू नका. प्रामुख्याने कॉलेज मधील तरुणांना असे मेसेजेस पाठवले जात असून कोणीही बळी पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. असे ऑफरचे मेसेजेस किंवा कॉल आले की जवळच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलिसांना संपर्क करा असे आवाहन ठाणे सायबर सेल पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी केले आहे.

(Valentine’s Day: Beware of fraud messages claiming free stay packages at luxurious hotels)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments