आपलं शहर

वर्सोवा: पहा व्हिडिओ, LPG गॅसच्या गोदामाला भीषण आग.. एकापाठोपाठ होतायत सिलेंडरचे स्फोट

मुंबईमध्ये आज सकाळी वर्सोवा मध्ये एलपीजी गॅसच्या सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली. काही क्षणातच आगीचा मोठा भडका उडाला आणि आग लागली. आग आटोक्यात आण्याच काम जोराने सुरू आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीत 4 जण जखमी झालेत आणि त्यांना जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

आत्तापर्यंत आगीत 150 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. आत्तापर्यंत इथे लिकेज झालेले 4 सिलेंडर मिळाले आहेत आणि त्यावर कुलिंगच काम चालू आहे.राकेश कडू (30), लक्ष्मण कुमावत (24), मुकेश कुमावत (30) आणि मनजीत खान (20) ही जखमिंची नवे आहेत.

वर्सोवामधील यारी रोड परिसरात सकाळी 10.20च्या सुमारास ही आग लागली आहे. या भागात जवळच अंजुमन शाळा आणि काळसेकर रुग्णालय आहे. आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments