फेमसखूप काही

LIGER: विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘या’ दिवशी होणार रिलीज

बॉलीवूड फिल्ममेकर आणि धर्मा प्रॉडक्शनचे करण जोहर (Karan Johar) याने काही महिन्यांपूर्वी LIGER या त्याच्या बिग बजेट सिनेमाची घोषणा केली होती. आता या सिनेमाची रिलीज डेट स्वत: करण जोहरने ट्विटरद्वारे जाहीर केली आहे. विजय देवरकोंडाची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा यावर्षी 9 सप्टेंबर रोजी वर्ल्डवाईड रिलीजसाठी सज्ज आहे. हा सिनेमा भारतातील 5 भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. दरम्यान या सिनेमातून अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

करण जोहरने एक ट्विट करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या ट्विटमध्ये तो लिहितो, “येत्या 9 सप्टेंबर रोजी #Liger सिनेमागृहात रिलीज होणार आहे. हा सिनेमा जगभरात हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्ल्याळम या 5 भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.” या ट्विटसोबतच करण जोहरने या सिनेमाचे पोस्टरदेखील शेअर केले आहे.

अभिनेता विजय देवरकोंडा या सिनेमात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे हे या पोस्टरवरून लक्षात येते आहे. विजयने या सिनेमासाठी थायलंडला जाऊन तिथे मार्शल आर्ट्सची ट्रेनिंग घेतली आहे. या सिनेमामध्ये विजयसोबत, अनन्या पांडे, रोनित रॉय, विष्णू रेड्डी, राम्या कृष्णन या कलाकारांच्या भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Puri Jagannadh) यांचे आहे. तर करण जोहर आणि अपूर्व मेहता या सिनेमाची निर्मिती करीत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments