कारण

नाना पटोलेंचा राजीनामा, नवा विधानसभा अध्यक्ष कोण? पवारांनी व्यक्त केली शक्यता

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपविला आहे. राजीनामा सोपविण्यापूर्वी त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

गेले काही दिवस महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. त्यामध्ये नाना पटोले यांच नाव कायम आघाडीवर होतं. अशातच पटोलेंनी बुधवारी दिल्ली येथे जाऊन राहूल गांधी यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर या राजकीय हालचालींनी जोर धरला.

दरम्यान, नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर नवीन विधानसभा अध्यक्ष कोण असणार याकडे आता सगळ्याचं लक्ष लागून आहे.

पक्षांतर्गत दबावामुळे अध्यक्ष बदलला

नाना पटोले राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार एका पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यामुळे अध्यक्ष बदलला जात असल्याचं यावेळी पवार म्हणाले. शिवाय, विधानसभा अध्यक्ष बदलताना आमच्यासोबत काँग्रेसने चर्चा केली आहे असं देखील त्यांनी म्हटलं.

विधानसभा अध्यक्षपद आता तिन्ही पक्षांसाठी खुलं झालं
दरम्यान, पुढील विधानसभा अध्यक्ष कोण असेल यावरही पवार यांनी उत्तर दिलं आहे. काँग्रेसकडे असलेलं विधानसभा अध्यक्षपद आता तिन्ही पक्षांसाठी खुलं झालं आहे. त्यामुळे आता नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये पुन्हा चर्चा होतील, असं ते यावेळी म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments