खूप काही

Bigg Boss Voice Person : बिग बॉसच्या विजयावर हे सेलिब्रिटी नाव करण्याच्या तयारी..

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम “बिग बॉस 14” मोठ्या उत्साहात ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू झाला. मात्र यावेळेस बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टिम आणि सर्व स्पर्धकांवर महत्त्वाची जबाबदारी होती. ती जबाबदारी म्हणजे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे. कारण, भारतात लॉकडाऊन असताना हा कार्यक्रम सुरू झाला होता आणि त्यावेळेस मनोरंजनाची साधने फक्त स्मार्टफोन आणि टिव्ही इतकीच होती.

लॉकडाऊनमुळे कंटाळलेल्या प्रेक्षकांचे या कार्यक्रमाने भरपूर मनोरंजन केले आहे. आता तब्बल 143 दिवसांनंतर ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते तो या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा आज संपन्न होत आहे. यंदाच्या पर्वाचा विजेता कोण असणार याची प्रेक्षकांना उत्सुक्ता लागलेली आहे. थोड्याच वेळात कार्यक्रमाचा होस्ट सलमान खान, या पर्वाच्या विजेत्याच्या नावाची घोषणा करणार आहे.

बिग बॉस 14 च्या टॉप पाचमध्ये रुबीना दिलैक, निक्की तांबोळी, राहूल वैद्य, अली गोनी आणि राखी सावंत यांचा समावेश आहे. यामधील विजेता कोण ठरणार हे थोड्याच वेळात समजणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments