फेमस

Pooja Chavan : पूजा चव्हाण प्रकरणात भाजप आक्रमक का, चित्रा वाघ म्हणतात…

राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी अजूनही कोणाला अटक करण्यात आली नाही. लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. भाजप देखील याप्रकरणी आक्रमक झाली आहे. तसेच याप्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आज चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर आणखी एक प्रतिक्रिया दिली आहे. (Why BJP is aggressive in Pooja Chavan case, says Chitra Wagh)

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण:
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचे साक्षीदार असलेल्या मुलांना सुरुवातीला का सोडण्यात आले याचा शोध घेतला जात आहे. या सर्व बाबींमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

“राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही दिवसांपूर्वी कोविडची लागण झाली आहे. मात्र गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे संजय राठोड यांचे संरक्षण करत आहेत का?” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच पोलिसांना संपूर्ण महाराष्ट्रात एक मंत्री सापडत नाही हे अतिशय दुर्दैवी आहे. या सर्व गोष्टी संशयास्पद वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जर त्या ऑडिओ क्लिप्स ऐकल्या नसतील तर त्यांनी त्या नीट ऐकाव्यात. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा संजय राठोड यांचाच आहे. त्यामुळे संजय राठोड यांची गच्छंती व्हावी आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला हवा, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, राज्यात या प्रकरणामुळे खळबळ माजली असताना या प्रकरणातील संशयित मंत्री संजय राठोड मात्र गेल्या काही दिवसांपासून नॉट रीचेबल आहेत. (Why BJP is aggressive in Pooja Chavan case, says Chitra Wagh)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments