लोकल

Mumbai Local : 15 दिवस वाट पाहणार नाहीतर; मुंबई लोकलबद्दल होऊ शकतो मोठा निर्णय…

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. रोज 3 ते साडेतीन हजारच्या दरम्यान असणारी कोरोना रुग्णांची संख्या अचानक 4 ते साडेचार हजारपर्यंत वाढली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.

राज्यात अचानक वाढलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, तर त्यापाठोपाठ विदर्भातील रुग्णांची संख्याही वाढत आहे, त्यामुळे ‘पुन्हा लॉकडाऊन की कडक निर्बंध’ या गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे. (Increase of corona patients in Mumbai)

1 फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल सर्वांसाठी सुरू केल्यानंतर कोरोना रुग्णांची वाढ होऊ लागली, असा प्रथम अंदाज वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे येत्या 15 दिवसांत मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसह रुग्णांच्या आकडेवारीवर नजर ठेवली जाईल, त्यानंतर मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू ठेवायची की त्या नियमांमध्ये पुन्हा बदल करायचे, यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. (Will Mumbai Local be closed again?)

मुंबई लोकलबद्दल विचार करत असताना आसपासच्या महानगरपालिकेंचाही विचार केला जाईल, अशी माहिती काकाणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि नवी मुंबई महापालिका यांना विचारात घेऊन, मुंबई लोकलबाबत निर्णय घेतला जाणार आहे. (A big decision can be made about Mumbai Local)

येत्या 22 फेब्रुवारीपर्यंत कोरोना रुग्णांच्या वाढीवर लक्ष दिलं जाईल, त्यात दिवसेंदिवस वाढ होत असेल तर मुंबई लोकल सर्वांसाठी चालू की त्यावर आणखी निर्बंध लागतील, यावर विचार केला जाईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. (BMC Additional Commissioner Suresh Kakani)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments