कारण

रस्त्यावरील खिळे केंद्राला बोचले, कायमचे उखडले की दुसऱ्या ठिकाणी ठोकले…

दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांकडून सीमेवर मोठी खबरदारी घेण्यात आली. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रोडवर टोकदार खिळे रोवले. आणि हा व्हिडीओ संपूर्ण देशात व्हायरल झाला. विविध माध्यमातून दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका झाली.

आज (4 फेब्रुवारी रोजी) सकाळी 11 वाजताच्या सुमारास रस्त्यावर ठोकलेले टोकदार खिळे काढण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हे खिळे दुसऱ्या जागी लावण्यात येणार आहेत. तसेच गरज लागल्यास इतर ठिकाणीही खिळे लावण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली आहे. टिकरी बॉर्डर, सिंधू बॉर्डर, आणि गाझीपूर सीमेवर पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच खबरदारीच्या दृष्टीने अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले व अनेक ठिकाणी भिंतीही उभारण्यात आल्या. दिल्लीच्या सीमेभोवती तटबंदी देखील करण्यात आली आहे. या शिवाय कोणताही जमाव दिल्लीत येऊ नये म्हणून सीमेवर टोकदार जाळ्याही लावण्यात आल्या आहेत.

(Work begins to remove sharp nails planted on Delhi border to block farmers)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments