खूप काही

5G Mobile Network : तुमचा मोबाईल अपडेटला लावा, लवकरच 5G नेटवर्क भारतात येतय…

सध्या देशात 5 जी नेटवर्कला घेऊन अनेक चर्चा सुरु आहे, तशातच अनेक शास्त्रज्ञ्जांनीदेखील यावर मत मांडण्यास सुरुवात केली आहे. अनेक शास्त्रज्ञ्जांच्या मते भारतातल्या अनेक शहरात लवकरच 5जी नेटवर्कची सुविधेला सुरुवात होईल, त्यातच अजून मोठी गोष्ट आता समोर आली आहे.

दूरसंचार उद्योग तज्ज्ञांनी भारतातल्या 5 जी नेटवर्कबद्दल मोठी माहिती दिली आहे. भारतात तीन महिन्यांच्या आत 5G नेटवर्क सुरु होण्याची शक्यता आहे. परंतु ते केवळ मर्यादित क्षेत्रांसाठी असेल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे. या तंत्रज्ञानासाठी लागणारे ऑप्टिकल फायबर अध्याप भारतात तयार नसल्याने या नेटवर्कला उशीर होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.(5G Network in india)

नोकिया इंडियाचे मार्केटिंग अँड कॉर्पोरेट अफेअर्सचे प्रमुख अमित मारवाह यांनी जी नेटवर्कवर एक शक्यता वर्तवली आहे. ज्याची चर्चा संपूर्ण देशात सुरु आहे.

5G नेटवर्कबाबत भारताला लवकर निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर येत्या पिढीला या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेता येणार नाही. जर आपण 5G नेटवर्क लवकर सुरू केले नाही, तर ते आपण कदाचित आपल्याला फायदा होणार नाही. जगाच्या आर्थिक मूल्य निर्मितीसाठी आणि देशाच्या भविष्यासाठी या नेटवर्कची खूप गरज असल्याचं अमित मारवाह यांनी म्हटलं आहे.

नॅसकॉम कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि टेक महिंद्राचे अधिकारी जगदिश मित्रा यांच्या मते भारतीय बाजारासाठी ही मोठी संधी आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, आपण भारतात कोणतेही तंत्रज्ञान तयार केल्यास ते निर्यातदेखील करू शकतो. त्यामुळे भारतात सुरु होणाऱ्या 5 जी नेटवर्कचा फायदा फक्त भारतालाच होणार असं नाही, तर परदेशांना देखील होऊ शकतो.

दूरसंचार क्षेत्र परिषदेचे अरविंद बाली यांच्या मते तंत्रज्ञान तयार करण्यासाठी भारताला इतरांचा पाठिंबा घ्यावा लागेल. देश संपूर्ण तंत्रज्ञान स्वतः तयार करू शकत नाही. 5G नेटवर्कमुळे सामान्य जनतेलादेखील रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. मात्र ही पक्रियेला लवकर सुरुवात करावी लागेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments