कारण

त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह, जिथे मनसुख हिरेनची सापडली डेड बॉडी

ज्या मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता, त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यासह देशभरात चर्चेत असलेला मुद्द्यामध्ये दिवसेंदिवस अनेक खुलासे समोर येत आहेत. मुकेश आंबानीच्या घरासमोर सापडलेली जिलेटीनने भरलेली कारही मनसुख हिरेनची असल्याचं तपासात उघड झालं.

त्यानंतर काही तासात मनसुख हिरेनचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली, आता त्याच्या संबंधित अनेक घटना समोर येत आहेत. या सगळ्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. (One more unidentified dead body found at Mumbra Reti Bunder)

ज्या मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता, त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथील रहिवासी शेख सलीम अब्दुलचा असल्याची माहिती आता समोर येत आहे. तो मृतदेह तिथे कसा आला, ही आत्महत्या की हत्या, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत.


मुंबई पोलिसांकडून संबंधित मृतदेहाचा तपास सुरु आहे. या मृतदेहाचं मनसुख हिरेन प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचाही तपास करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मृतदेह पाण्यातून वाहून तिथे आलाय की मुंब्रा रेती बंदरजवळच कोणती घटना घडली आहे, याचादेखील तपास केला जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

API Sachin Vaze Arrested : हाय होल्टेज ड्रामानंतर सचिन वाझेंना अटक, 13 तास चाललेल्या केसचा शेवट कसा?

Maharashtra Assistant Police Inspector Sachin Vaze : एपीआय सचिन वाझे यांना अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यामागच्या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या कारणाने अटक केली आहे, शनिवारी दिवसभरात तब्बल 13 तास कसून चौकशी केल्यानंतर अखेर अटक करण्यात आली आहे. (Antilia-SUV Case: Cop Summoned By Probe Agency Arrested)
सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्यावर कलम 286, 465, 473, 506(b), 120(b), त्यासोबतच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चा मोठा खुलासा…

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील निवास्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यूप्रकरणी ATS ला एक मोठी माहिती हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिरेन यांना आधी मारून मग त्यांना खाडीत ढकलण्यात आल्याची महत्वाची माहिती एटीएस ला मिळालेली आहे. ग्रँट गवर्नमेंट मेडिकल कॉलेज यांच्यामार्फत करण्यात आलेल्या diatom टेस्टनुसार, हिरेन यांच्या शरीराचा जेव्हा पाण्याशी संपर्क झाला त्यावेळी ते जिवंत होते. (ATS’s big revelation in Mansukh Hiren death case)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments