खूप काही

ऑनलाईन कॅब बूक केली आणि उडाले तब्बल 52,000 रुपये…

गुगलवरून मिळालेल्या ओला कॅबचा कस्टमर केअरचा नंबरवर मदतीसाठी फोन केला आणि हजारोंचे नुकसान करून घेतले.

ऑनलाईन कॅब बूक केल्यानंतर 42 वर्षीय महिलेने आपले तब्बल 50 हजार 260 रुपये गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुगलवरून मिळालेल्या ओला कॅबचा नंबरवर संपर्क केल्यानंतर हा प्रकार घडला आहे. (After booking the cab online, Rs 50,260 was swindled)

ऑनलाईन कॅबचे आनलाईन ट्रान्जेक्शन होत नसल्याने कस्टमर केअरचा नंबर गुगलवरून मिळवला. तो नंबर जस्ट डाईलच्या माध्यमातून मिळाला, त्यावर कॉल केल्यानंतर ओला कॅबचा ग्राहक सेवा क्रमांक असल्याचे समजले.

‘जस्ट डायल’ वरून आलेल्या कस्टमर केअरच्या नंबरवर विश्वासाने संपर्क करून ऑनलाईन पेमेंटबद्दल संबंधित महिलेने चौकशी केली. ऑनलाईन पेमेंट करताना आलेल्या अडचणींचं निराकरण त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न त्या महिलेने केला.

कोटक महिंद्राचे बँक अकाऊंट ऑनलाईन पेमेंटसाठी जोडल्यानंतर आपल्याकडे आलेला ओटीपी नंबरही महिलेने कस्टमर केअरच्या व्यक्तीशी शेअर केला, त्याचवेळी अकाऊंटमधून 52 हजार 260 रुपये कट झाल्याचा मॅसेज संबंधित महिलेल्या फोनवर आला, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार उघड आला.

संबंधित महिला ठाण्याच्या जीबी रोडवरील भाईंदरपाडा येथील विवांत लोढा स्प्लेंडर सोसायटीमध्ये आपल्या पाहुण्यांकडे आली होती, त्यावेळेस हा सगळा प्रकार घडला आहे.(Fraud occurred after booking a cab online)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments