खूप काही

Scam 1992 च्या यशानंतर सोनी लिवची Scam 2003 ची घोषणा; पाहा काय आहे स्टोरी

मागीलवर्षी आलेल्या Scam 1992: The Harshad Mehta Story च्या यशानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म Sony Liv ने आता एका नव्या स्कॅमची अर्थात वेबसिरिजची घोषणा केली आहे. Scam 2003: The Curious Case of Abdul Karim Telgi असे या वेबसिरिचे नाव आहे. दरम्यान, हा सिझनचे दिग्दर्शन देखील दिग्दर्शक हंसल मेहता हेच करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या वेबसिरिज विषयी खूप उत्सूकता निर्माण झाली आहे.

Scam 2003: The Curious Case of Abdul Karim Telgi ही वेबसिरिज 2003 च्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर आधारित आहे. अब्दुल करीम तेलगी हा या घोटाळ्याचा मास्टरमाईंड होता. या घोटाळ्याची अंदाजे किंमत ही जवळपास 20 हजार कोटी इतकी होती.

पत्रकार संजय सिंह यांच्या “रिपोर्टर की डायरी” या पुस्तकावर ही सिरिज आधारीत आहे. संजय सिंह यांनीच 2003 मध्ये या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. या सिरिजच्या लिखाणासाठी संजय सिंह यांच्यासोबत मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक किरण यद्न्योपवित यांची निवड करण्यात आली आहे. वेबसिरिजचे चित्रीकरण यावर्षीच्या अखेरीस सुरू होणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments