खूप काही

AICTE द्वारे पदवी परीक्षांच्या पात्रता नियमांमध्ये मोठा बदल; इंजिनिअरिंगसाठी बारावीत मॅथ्स, फिजिक्स हे विषय गरजेचे नाहीत

AICTE म्हणजेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था या संस्थेने बीई आणि बीटेक अभ्यासक्रमाच्या 2021-22 या शैक्षणिक वर्षातील प्रवाशांसाठी मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स हे विषय बारावीत असणे अनिवार्य नसल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (AICTE Made new changes for Engineering UG program )

एआयसीटीई ने बुधवारी 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठीची हस्तपुस्तिका (हँडबुक)सादर केली. या हस्तपुस्तिके मध्ये या निर्णयाबद्दल नमूद केले गेले आहे. आतापर्यंत इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी यांच्या पदवीपूर्व (अंडर ग्रॅजुएशन) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीत मॅथ्स आणि फिजिक्स हे विषय अनिवार्य होते.

नव्या नियमानुसार विद्यार्थी बारावीला पुढील पैकी कोणतेही तीन विषय घेऊन इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ शकतो:

फिजिक्स / मॅथेमॅटिक्स / केमिस्ट्री / कॉम्पुटर / सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि /
बायोलॉजी / इन्फॉरमेशन प्रॅक्टिसेस / बायोटेकनॉलॉजी / टेक्निकल व्होकेशनल विषय / एग्रीकल्चर / इंजिनिअरिंग ग्राफिक्स /बिझनेस स्टडीज / आंत्रप्रिनरशीप .

विद्यार्थ्यांना वरील नमूद विषयांमध्ये एकत्रित 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे. एआयसीटीई ने हस्तपुस्तिकात म्हटले आहे की, ‘विद्यापीठांनी मॅथ्स, फिजिक्स, इंजिनिअरिंग ड्रॉईंग यांसारखे विद्यार्थ्यांच्या सोयीचे ब्रिज कोर्सेस उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून विविध स्थरांवरील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा लाभ घेणे शक्य होईल.’

परंतु एआयसीटीईच्या या निर्णयाचा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी मॅथ्स हा महत्वाचा विषय आहे असं मत असणाऱ्या शिक्षण तज्ज्ञांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments