कारण

‘Maharashtra budget 2021’ – पृथ्वीराज चव्हाणांसह 20-25 आमदारांसाठी विधानभवनाचे द्वार बंद

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर होत असताना राजकीय क्षेत्रात भूकंप आणणारी एक घटना घडली आहे. कोरोना चाचणी न केल्याने तब्बल 20 ते 25 आमदारांना विधानभुवनातून परत पाठवण्यात आले असा दावा सपा नेते अबू आझमी यांनी केला आहे. (Along with Pruthviraj Chavhan other 20-25 MLA’s entry restricted at assembly.) )

अबू आझमींच्या म्हणण्यानुसार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह 20-25 आमदारांना कोरोना टेस्ट न केल्याने प्रवेश नाकारला. अबू आझमी म्हणाले. “ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह 20-25 आमदारांना कोरोना टेस्ट न केल्याने प्रवेश दिला नाही. दुसऱ्यांदा करून टेस्ट करण्याची माहिती त्यांना दिलेली नव्हती. संवादाचा आभाव इथे दिसतोय. आज अर्थसंकल्पाचा दिवस असल्याने त्यांना विधभावनात बसण्याची परवानगी द्यायला हवी होती.”

कोरोना चाचणी न केल्यामुळे काही आमदारांना माघारी फिरावे लागले. तर 8 ते 10 आमदारांनी आत्तापर्यंत आर टी पी सी आर टेस्ट केली आहे. त्यांचा अहवाल आल्यावर त्यांना सभागृहात सोडण्यात आले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अधिवेशनाला हजर राहणाऱ्या आमदार, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार अशा सर्वांनी कोरोना चाचणी करणे नियमाने बंधनकारक होते.

अधिवेशना दरम्यान कोरोना पासून बचावासाठी नियोजन :

एका आठवड्यात सलग चार दिवस अधिवेशनाचे कामकाज चालायचे. यांनतर तीन दिवस सुट्टी द्यायची. त्यानंतर पुढील आठवड्यात कामकाज सुरु करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांची कोरोना चाचणी करायची यामुळे जर कामाच्या दिवसात कोणाला कोरोनाची लागण झाली तर त्यांना अधिवेशनात येण्यापासून रोखता येईल. असं नियोजन राज्यसरकारने केले होते.
याप्रमाणेच शुक्रवारी. सभागृहाचं कामकाज संपताच शनिवार रविवार सुट्टी होती. त्यानंतर आज सोमवारी अधिवेशन सुरु झालं. त्यानुसार आमदारांनी पुन्हा आर टी पी सी आर टेस्ट करून घेणं गरजेचं होत. परंतु काही आमदारांनी या नियमाचे पालन न केल्याने त्यांना अधिवेशनाला मुकावं लागून आपल्या चुकीची किंमत चुकवावी लागली

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments