कारण

इस्राईल दूतावासासमोर स्फोट ते अंबानींच्या घरासमोर कार; NIA ची मोठी माहिती

NIA एजन्सीच्या म्हणण्यानुसार मुंबईतील अंबानींच्या घरासमोर जिलेटीनने भरलेली कार सापडणे हे एक स्थानिक प्रकरण आहे, तर इस्राईल दूतावासाच्या बॉम्बस्फोटात सीरिया आणि अफगाणिस्तानातील काही संघटनांचा हात असल्याचं तपासात उघड झालं आहे. (Ambani security scare and Israel embassy blast, No technical link between then)

29 जानेवारीला नवी दिल्ली येथील इस्त्रायलच्या दूतावासाबाहेर झालेला स्फोट आणि त्यानंतर तब्बल एक महिनानंतर 25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं दहशतवादीविरोधी पथकाने सांगितलं आहे.

“जैश-उल-हिंदने दिल्लीच्या स्फोटाची जबाबदारी घेतल्यानंतर मुंबई प्रकरणातही त्यांचात हात असल्याचा संशय आतापर्यंत बळावला जात होता,मात्र मुंबई पोलीस आयुक्तांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे.

इंडियन मुजाहिद्दीन संघटनेतील दहशतवादी तहसीन अख्तर हा सध्या तिहार तुरूंगात बंदिस्त आहे,तिथल्या एका फोन नंबरवरून एक संदेश प्राप्त झाल्याचे मुंबई तपास यंत्रणेकडून उघड झालं आहे. त्यामुळे तिहार कारागृहात एका दहशतवाद्याकडे स्मार्ट फोन कसा जाऊ शकतो, यावरही शंका उपस्थित केली जात आहे.

मुंबई पोलिसांसह तपास यंत्रणेला गोंधळात घालण्यासाठी हा सगळा प्रकार सुरु असल्याने या दोन्ही प्रकरणातून नेमका काय निष्कर्ष निघतो, हे पाहणे गरजेचे आहे. (Blast in front of Israeli embassy to car in front of Ambani’s house; Big NIA information)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments