फेमस

ऍसिड अटॅकच्या धमकीला शेहनाज गिलचं सडेतोड प्रतिउत्तर

अभिनेत्री आणि गायिका शेहनाज गिल बिग बॉस 13 मधून संपूर्ण देशा समोर आली. शेहनाज ने तिच्या नखरेल अदांनी आणि निरागस स्वभावाने सर्वांचीच मन जिंकून घेतली. त्यानंतर शेहनाज सिद्धार्थ शुक्ला सोबत टोंनी कक्कर च्या एका गाण्यात दिसली ज्यातील तिच्या मके ओव्हर मुळे तिच्या चाहत्यांची यादी बरीच वाढली. शेहनाज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर खूप ऍक्टिव्ह असते. इंस्टाग्राम रील्स, पोस्ट, ट्विट, याद्वारे शेहनाज तिच्या चाहत्यांच्या भेटीला येत असते. (An amazing reply of Shehnaz gill to acid attack threats.)

सोशल मीडिया वर जस चाहत्यांचे प्रेम मिळते तसच निंदा करणाऱ्यांच्या टीका ही ऐकाव्या लागतात. परंतु या टीकांच गंभीर स्वरूप तेव्हा पाहायला मिळत जेव्हा टीका धमकीत बदलतात. हो ! शेहनाज ला सुद्धा अशाच एका अप्रिय प्रसंगाला सामोरे जावे लागले. शेहनाजला ऍसिड अटॅकची धमकी मिळाली आहे. 

नुकतंच शेहनाजने बॉलीवूड हंगामाला मुलखात दिली. या मुलखातीत एक चाहत्याने तिला मिळालेल्या ऍसिड अटॅकच्या धमक्या आणि मॉर्फ विडिओ बद्दल प्रतिक्रिया विचारली असता ही गोष्ट समोर आली. यावर शेहनाज ने “जे लोक हे सर्व करत आहेत त्यांचं मी अभिनंदन करते. यामुळे मला काहीच फरक पडत नाही पण यामुळे मला सहानुभूती मिळते आणि लोकांचं माझ्यावरच प्रेम अजूनच वाढत आहे. या लोकांना कळत नाही की जर ते कोणाबद्दल काही वाईट बोलत आहेत तर त्यामुळे त्या व्यक्तीलाच सहानभूती मिळत आहे. म्हणून जे हे सर्व करतात त्यांनी हे करून नये.” 

 निरागस दिलखुलास आणि निर्भीड स्वभावाच्या शेहनाजला चाहते शेरनी का बोलतात याच हे एक उत्तम उदाहरण आहे. नकारात्मक गोष्टींचा सकारात्मक दृष्टीने स्वीकार करून स्वतःच वेगळं रूप शेहनाजने आपल्या चाहत्यांपुढे ठेवलं आहे.  

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments