खूप काही

Apple Days Sale: iPhoneच्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळत आहे बंपर डिस्काऊंट; आत्ताच लाभ घ्या…

तुम्ही जर सध्या एखादा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर iPhone 12 Mini हा फोन खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे. ई-कॉमर्स साईट ॲमेझॉन इंडियाने 12 मार्चपासून Apple Days Sale ची घोषणा केली आहे. यामध्ये ॲपलच्या लेटेस्ट iPhone सह सर्व उपकरणांवर धमाकेदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. हा सेल येत्या 17 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

सेलच्या पहिल्याच दिवशी iPhone 12 Mini हा स्मार्टफोन बेस्ट डील्समध्ये सामिल झाला होता . iPhone 12 Mini हा स्मार्टफोन मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारात उपलब्ध करण्यात आला होता. या स्मार्टफोनची किंमत 69 हजार 900 रुपये इतकी आहे. पण जर तुम्ही Apple Days Sale दरम्यान हा फोन खरेदी केला तर तुम्हाला 2 हजार 890 रुपयांचा डिस्काऊंट दिला जाईल. त्यानुसार हा स्मार्टफोन तुम्हाला 67 हजार 100 रुपयात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. तसेच तुमच्याजवळ जर एचडीएफसी बँकेचे कार्ड असेल तर तुम्हाला 6 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन 61 हजार 100 रुपयांना खरेदी करू शकता.

iPhone 12 Mini बद्दल
iPhone 12 Mini मध्ये ड्यूअल सिम सपोर्ट दिला गेला आहे. त्यामध्ये तुम्ही नॅनो आणि ई-सिमचा उपयोग करू शकता. या स्मार्टफोनमध्ये 5.4 इंचचा सुपर रेटिना XDR OLED डिसप्ले दिला आहे. तसेच ड्यूअल कॅमेरा सेटअप, ज्यात 12 मेगा पिक्सलचा वाईड अँगल लेन्स आणि अल्ट्रा वाईड अँगल शूटर सामिल आहे. सोबतच स्मार्टफोनला MagSafe वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments