कारण

Bank holidays in April 2021 : बँकांना 15 दिवस सुट्टी, तुमची कामं थांबण्याची शक्यता…

येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये तब्बल 15 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुमची बँकमधील सर्व कामे वेळेत करून घेण्यासाठी आताच ही माहिती समजून घ्या की नेमकी कोणत्यादिवशी या बँका बंद असणार आहेत.

नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. सोबतच आयकर, बचत आणि बँकिंगशी संबंधित बर्‍याच गोष्टींमध्ये बदल होतील. आपल्याकडे एप्रिलमध्ये बँकिंगशी संबंधित कोणतेही महत्त्वपूर्ण काम असल्यास आपणास थोड्या वेळाने सावधगिरी बाळगावी लागणार आहे, कारण एप्रिलमध्ये बँका 15 दिवसांसाठी बंद असल्याची माहिती समोर येत आहे. (April is a 15 day holiday for banks, find out what is the reason)

आपल्याकडे एप्रिलमध्ये बँकिंगशी संबंधित कोणतेही महत्त्वपूर्ण काम असल्यास ती लवकर करून घेण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला देत आहोत. कारण एप्रिलमध्ये बँका 15 दिवसांसाठी बंद असतील. तर त्या सुट्ट्यांविषयी आपल्याला अगोदरच माहिती असेल तर चांगले आहे, कारण तुमचे कोणतेही काम अडकणार नाही.

एप्रिल महिन्यात 15 दिवर बँक असतील बंद

तारिख           बँक बंद
1 एप्रिल – बँकमध्ये खाताबंदी होत असल्याने ग्राहकांसाठी बँक बंद असणार आहे
2 एप्रिल – गुड फ्रायडेमुळे बँक बंद
4 एप्रिल – रविवार
5 एप्रिल – बाबू जगजीवन राम जयंतीमुळे बँकांना सुट्टी
6 एप्रिल – तमिलनाडूमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने बँक बंद
10 एप्रिल – दुसरा शनिवार असल्याने कामकाज बंद
11 एप्रिल – रविवार
13 एप्रिल – गुडी वाढवा /तेलुगू नववर्ष दिन/उगादी महोत्सवमुळे बँक बंद
14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब अंबेडकर जयंती
15 एप्रिल – हिमाचल दिवस /बंगाली नववर्ष दिवसमुळे सुट्टी
16 एप्रिल – बोहाग बिहूची दुसऱ्यादिवशी सुट्टी
18 एप्रिल – रविवार
21 एप्रिल – रामनवमीमुळे जयंती
24 एप्रिल – चौथा शनिवार
25 एप्रिल – रविवार

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments