खूप काही

कोल्हापूरच्या मणिकर्णिका कुंडात सापडला या आश्चर्यकारक वस्तूंचा खजिना

कोल्हापूर मधील करवीर निवासिनी आंबाबाई, महालक्ष्मी मंदिराच्या आवारात मणिकर्णिका कुंडाच्या उत्खननास सुरवात झाली आहे. या उत्खनना दरम्यान तब्बल ४५७ वस्तू सापडल्या आहेत. या आश्चर्यकारक गोष्टींमध्ये प्राचीन वस्तूंसोबत जर्मनीची रिव्हॉल्व्हर सुद्धा सापडली आहे. (archeologist excavated over 450 subjects from manikarnika kund. )

२०१३ मध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुर्णत्वाशी जे जे सुसंगत आहे ते पुर्नजीवित करा जे जे विसंगत आहे, ते दूर करा असा आदेश दिला होता. त्यानुसार मंदिराच्या आवारातील मणिकर्णिका कुंडाच्या उत्खननाला सुरवात करण्यात आली. हा कुंड जवळ जवळ ६५ वर्षांपूर्वी बुजवण्यात आला होता. त्यानंतर ती जागा कोल्हापूर महानगर पालिकेच्या ताब्यात होती. २०२० मध्ये कोल्हापूर महानगर पालिकेने ही जागा पुन्हा मंदिराच्या स्वाधीन केली.

मणिकर्णिका कुंडाचा आकार ६० बाय ६० फूट असून आकार चौकोनी आहे. त्याच्या चारही बाजूला शिवलिंग आहे.
सोळा पाण्याचे झरे, पन्नास विरगळ असणाऱ्या या कुंडात उतरण्यासाठी उत्तर-दक्षिण अशा दोन्ही बाजूंना पायर्यांच्या वाटा आहेत. आतापर्यंत साडे दहा मीटर पर्यंत गाळ काढण्यात आला असूनही अजून सुद्धा या कुंडाचा तळ नाही आहे.

काय काय सापडले उत्खननादरम्यान :
अशी मान्यता आहे की, जेव्हा अंबाबाई महालक्ष्मी मंदिराची स्थापना झाली त्याच वेळी या कुंडाची सुद्धा स्थापना झाली होती. या कुंडाच्या उत्खननात ४७५ वस्तू सापडल्या आहेत. त्यात सहा इंच लांबीची काळ्या रंगाची चालू अवस्थेतील ‘मेड इन जर्मनी’ रिव्हॉल्वर, एक जिवंत काडतूस, आठ बुलेट चा संच, पितळेची टॉर्च, पेले, डबे, काही टाक, सुमारे १३५ तांब्याची नाणी, तसेच पाच ठिकाणी शिवलिंग असलेली आणि घोडयावर बसलेल्या देवी पार्वतीची पितळेची दुर्मिळ मूर्ती सापडली आहे. सोबतच बौद्ध आणि जैन शर्माशी साधर्म्य असलेली आणि मुख असलेली एक दगडी मूर्ती सापडली आहे. सर्वात नवल वाटावं ते या गोष्टीच , एकही ओरखडा नसलेलं एक भलं मोठं काचेचं कंदील सुद्धा या उत्खननादरम्यान सापडला आहे. या सर्व वस्तूंचे जातं आणि संवर्धन करण्यासाठी मोठे वस्तू संग्रालय उभारण्याचा विचार मंदिर समिती करत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments