आपलं शहर

अर्णब गोस्वामींना दिलासा, पण मुंबई पोलीस कधीही करु शकते अटक…

टीआरपी घोटाळा प्रकरणी पत्रकार अर्णव गोस्वामी यांना हाय कोर्टाकडून दिलासा देण्यात आला आहे.

टीआरपी घोटाळा प्रकरणी पत्रकार अर्णव गोस्वामी यांना हाय कोर्टाकडून दिलासा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनाही चौकशीसाठी अर्णव यांना कधीही ताब्यात घेऊ शकतात, अशी परवानगी दिली आहे. (Arnab Goswami consoled, but Mumbai police could arrest him anytime)

अर्णब गोस्वामीसह एआरजी आऊटलेअर मीडिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने आपला निकाल सादर केला आहे. यावर सुनावणी करताना राज्य सरकारला 12 आठवड्यांत तपास पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. हाय कोर्टाने जरी अर्णव गोस्वामींना अटकेपासून तुर्तास दिलासा दिला असला तरी मुंबई पोलीस त्यांना कधीही चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात, असा निर्णयही हायकोर्टाने दिला आहे.

अर्णब गोस्वामींच्या अटकेची शक्यता भासल्यास 3 दिवस आधी अर्णव यांना मुंबई पोलिसांना नोटीस देणं बंधनकारक असणार आहे. तात्काळ गोस्वामींना मुंबई पोलीस अटक करु शकत नाही, असा निर्णयदेखील हाय कोर्टाने दिला आहे, अर्नव गोस्वामींबद्दल पुढील निर्णय 28 जून रोजी होणार आहे, तोपर्यंत राज्य सरकारला टीआरपी घोटाळ्याबाबात आपला तपास पुर्ण करावा लागणार आहे.(Supreme Court consolation to Arnab Goswami)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments