खूप काही

Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चा मोठा खुलासा..

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवास्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी ATS ला एक मोठी माहिती हाती लागली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील निवास्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यूप्रकरणी ATS ला एक मोठी माहिती हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिरेन यांना आधी मारून मग त्यांना खाडीत ढकलण्यात आल्याची महत्वाची माहिती एटीएस ला मिळालेली आहे. ग्रँट गवर्नमेंट मेडिकल कॉलेज यांच्यामार्फत करण्यात आलेल्या diatom टेस्टनुसार, हिरेन यांच्या शरीराचा जेव्हा पाण्याशी संपर्क झाला त्यावेळी ते जिवंत होते. (ATS’s big revelation in Mansukh Hiren death case)

एका वरिष्ठ डॉक्टरांनुसार, “Diatom टेस्टचे अंतिम निकष एखादा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकत नाहीत. या टेस्टचा उपयोग तपासात सापडलेल्या पुराव्यांना पुष्टी देण्यासाठी केला जाऊ शकतो.” दरम्यान, एटीएस हा रिपोर्ट हरियाणा फॉरेन्सीक सायन्स लॅबोरेटरी, मधूबन (Haryana Forensic Science Laboratory, Madhuban) येथे यातील माहितीची पुष्टी करण्यासाठी पाठवणार असल्याची माहिती आहे.

ATS मधील एका अधिकार्यानुसार तपासादरम्यान हिरेन यांच्या तोंडावरील रुमालांचा स्त्रोत असे काही अनुत्तरीत प्रश्न आहेत. त्यामुळे अजूनही तपास सुरू आहे. तसेच मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी सांगितले होते की मनसुख यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याची अंगठी, टायटन कंपनीचे घड्याळ आणि पाच ते सहा एटीएम कार्ड गायब आहेत. जिथे हिरेन यांचा मृतदेह सापडला त्याजागी ह्या वस्तू मिळाल्या नाहीत.

‘त्या’ ठिकाणी NIA कडून वाझेंसोबत पाहणी
अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकंप्रकरणात एपीआय सचिन वाझे हे प्रमुख संशयित आहेत. वाझेंनी हा कट का आणि कसा रचला याच्या तपासासाठी NIA कडून काल माहिम खाडी, गिरगांव चौपाटी, वाझे राहत असलेली ठाण्यातील साकेत सोसायटी, अशा काही ठिकाणी पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत सचिन वाझे देखील उपस्थित होते.

दरम्यान, तपास यंत्रणेने याआधीच हे स्पष्ट केले आहे की अंबानींच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडी पार्क करण्यात सचिन वाझेंचा हात होता. (ATS’s big revelation in Mansukh Hiren death case)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments