खूप काही

मन हेलावून टाकणारी आयशाची सुसाईड नोट वडिलांनी आणली सर्वासमोर

साबरमती नदी मध्ये उदीमारून आत्महत्या करणाऱ्या आयशाचा तो विडिओ पाहणाऱ्याच्या हृदयाला पिळून जातो. चाऱ्यावर मंद हास्य आणि डोळ्यात दाटलेलं पाणी, मनावर न दिसणाऱ्या जखमांचे ओरखडे घेऊन आयशाने आत्महत्ये पूर्वी तिचा पती आरिफसाठी तो विडिओ बनवला होता. सोशल मीडियावर विडिओ वायरल होताच देशभरातून आयशाला न्याय मिळावा याची मागणी होऊ लागली. (Ayasha’s suicide note will melt your heart )

यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाही करून आयशाचा पती आरिफ याला राजस्थान मधील पाली येथून अटक केली.
शनिवारी या खटल्यादरम्यान आयशाच्या वडिलांच्या वकिलांनी कोर्टात आयशाद्वारे लिहिलेले पत्र सादर केले. हे पत्र आयशाने तिच्या पतीसाठी लिहिले होते.

या पत्रात आयशा लिहते, तू तुझा दोष लपवण्यासाठी माझं नाव असिफ सोबत जोडलस पण खरतर असिफ फक्त माझा चांगला मित्र आणि भाऊ होता. सोबतच आयशाने तिच्यावर केल्या गेलेल्या अत्याचाराचा उल्लेखही या पात्रात केला आहे. जे व्यक्त करताना आयशा लिहिते, तू मला चार दिवस खोलीत बंद करून ठेवलेस ना खायला दिल ना पाणी दिल आणि ते ही त्यावेळेस जेव्हा मी गर्भवती होते. तेव्हा ही तू माझ्या मदतीला आला नाहीस आणि जेव्हा आलास तेव्हा मला खूप मारलस ज्यामुळे माझा लिटल आरू आसिफ मेला. आता मी त्याच्या जवळच जात आहे.

याच पत्रात आयशा पुढे लिहिते, मी तुला फसवलं नाही तू दोन जीवन उध्वस्त केले आहेस. आय लव्ह यू कुकू, मी चुकीची नव्हते तुझा स्वभाव चुकीचा होता. मी तुझ्या डोळ्यांवर भाळले होते पण का हे मी पुढच्या जन्मतःच सांगू शकेन एवढं लिहिल्या नंतर आयशा लिहिते , लव्ह यु , यौर वाइफ आयशा आरिफ.

पोलिसांनी आरिफ विरोधात ठोस पुरावे असल्याने त्याची पोलीस कस्टडी घेण्यास नकार दिला. ज्यामुळे कोर्टाने आरिफ ला ज्युडिशियल कस्टडी मध्ये पाठवले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments